अन्नाच्या विषबाधेतून गाईंचा मृत्यू
By Admin | Updated: April 11, 2015 01:41 IST2015-04-11T01:41:07+5:302015-04-11T01:41:07+5:30
घोगली, गोठाडी, पाथरी परिसरातील घटना : शेतकऱ्यांमध्ये संताप

अन्नाच्या विषबाधेतून गाईंचा मृत्यू
घ गली, गोठाडी, पाथरी परिसरातील घटना : शेतकऱ्यांमध्ये संतापफोटो - रॅपमध्ये नागपूर : उघड्यावर टाकलेले अन्न खाल्यामुळे विषबाधा झाल्याने घोगली, गोठाडी, पाथरी परिसरातील शेतकऱ्यांच्या जवळपास १० गाईंचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ गायी अस्वस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जनावरांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने, परिसरातील शेतकरी संतप्त असून, पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविवार, ५ एप्रिल रोजी घोगली परिसरात रमेश लोखंडे यांच्याघरी लग्न कार्य होते. लग्नकार्य उरकल्यानंतर उरलेले अन्न कॅटरर्सच्या लोकांनी जवळच्या शेताच्या धुऱ्यावर टाकले. दोन ते तीन दिवसानंतर अन्न कुजल्याने, त्यावर बुरशी चढली होती. परिसरातील जनावरांनी पडलेले सडके अन्न खाल्ल्यामुळे अनेक गाई आजारी पडल्या. काही गाईंचा शेतातच मृत्यू झाला. काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जवळपास १० गाई मृत्युमुखी पडल्या असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तर तेवढ्याच गाईंवर उपचार सुरू आहे. कुजलेले अन्न खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घोगलीतील संतोष वनोकर, नाना रहाटे यांच्या दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी लोखंडे कुटुंबीयांशी संपर्क साधून नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र त्यांनी कॅटरींगवाल्याकडे बोट दाखवून, याप्रकरणातून हात काढून घेतला. दुभती जनावरे गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पोलिसात तक्रार करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.