शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोविशील्ड लसीबद्दल महत्त्वाची बातमी; डोसच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 09:34 IST

Corona Vaccination: विशेष गटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस वाट पाहावी लागणार नाही

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. देशात लसीकरणासाठी प्रामुख्यानं कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा वापर केला जात आहे. त्यातही बहुतांश रुग्णांना कोविशील्ड दिली जात आहे. याच कोविशील्डच्या दोन डोसच्या वेळापत्रकात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वपूर्ण बदल केला आहे. लसीबाबत चमत्कार नाही तर हा साधा प्रयोग ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावाकोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर आतापर्यंत दोनवेळा वाढवण्यात आला आहे. मात्र आता हेच अंतर कमी करण्यात आलं आहे. काही विशिष्ट गटांसाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे या गटांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस (१२ ते १६ आठवडे) वाट पाहावी लागणार नाही. या गटातील व्यक्ती २८ दिवसांत दुसरा डोस घेऊ शकतील. दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय केवळ कोविशील्डसाठी घेण्यात आला आहे. कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचं आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २०१६ मध्ये दिला गेला कोरोना लसीचा पहिला डोज; लस घेऊन आलेला तरुण टेन्शनमध्येकोणाला मिळणार २८ दिवसांत दुसरा डोस?नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करू इच्छिणारे २८ दिवसांनंतर कोविशील्डचा दुसरा डोस घेऊ शकतात. नोकरी, अभ्यासासाठी परदेशी जाणारे, ऑलिम्पिक टीमचा भाग असणारे कोविशील्डचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर घेऊ शकतील. त्यांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशील्डची निर्मिती केली जाते. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश कंपनी ऍस्ट्राझेनेकानं कोविशील्डसाठी संशोधन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोविशील्डच्या वापरास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोविशील्डची लस घेतलेल्या व्यक्ती जगभरात प्रवास करू शकतात. परदेशी प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्ती २८ दिवसांनंतर कोविशील्डचा दुसरा डोस घेऊ शकतील. मात्र इतरांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या