शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधील कोरोना विस्फोटामुळे संपूर्ण जगात दहशत, भारत अलर्ट मोडवर; धडाधड घेतले निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 19:19 IST

कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा चीनमध्ये कहर करत असताना आता जगाची चिंता वाढली आहे. चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येनं जगभरातील देशांना धडकी भरली आहे.

नवी दिल्ली-

कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा चीनमध्ये कहर करत असताना आता जगाची चिंता वाढली आहे. चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येनं जगभरातील देशांना धडकी भरली आहे. आज भारताच्या आरोग्य विभागानं तातडीनं एक बैठक बोलावली आणि महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. कोणत्याही कठीण परिस्थिला सामोरं जाण्यासाठी संपूर्ण तयारी आहे असा दावा सरकारनं केला आहे. कोरोनामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला याआधीच मोठा धक्का बसला आहे आणि पुन्हा एकदा असा धक्का सहन करणं नुकसानदायक ठरू शकतं. 

चीनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरातच कोरोनाच्या ३६ लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० हजार रुग्णांनी प्राण गमावले आहेत. चीनसह अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर अमेरिका, जर्मनी आणि तैवान सारख्या देशांमध्येही रुग्णवाढ होत आहे. 

चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेरइतर देशांच्या तुलनेत चीनमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. चीनच्या चोंगकिंग शहरातील काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यात धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यात रुग्णांसह डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं दिसून येत आहे. तसंच रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नसल्याचेही व्हिडिओ समोर आले आहेत. 

जागतिक बँकेनं वाढीचा अंदाज केला कमीचीनमध्ये कोरोना हातपाय पसरू लागल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. जागतिक बँकेनं आपल्या ताज्या अहवालात चीनच्या अंदाजित विकास दरात मोठी घट केली आहे. वर्ल्डबँकेनं चीनचा अंदाजित विकास दरात घट करून २.७ टक्के इतका केला. याआधी जून महिन्यात हाच दर ४.३ टक्के राहील असं जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या सहा महिन्यात १.६ टक्के घट झाली आहे. इतकंच नाही, तर जागतिक बँकेनं २०२३ या वर्षासाठी वाढीचा दर ८.१ टक्क्यांहून थेट ४.३ टक्के इतका केला आहे. 

भारताला चिंता करण्याची गरज नाहीचीनमधील कोरोना विस्फोटामुळे भारत सरकारही अलर्ट मोडवर आलं आहे. सरकारच्या दाव्यानुसार देशातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सरकार सज्ज आहे. तसंच कोरोना गेलेला नाही त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली. यात निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी बैठकीनंतर भारतातील जनतेनं पॅनिक होण्याचं काही कारण नाही. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि बूस्टर डोस जरूर घ्यावा असं आवाहनही डॉ. पॉल यांनी केलं आहे. 

आवश्यक पावलं उचलणारदेशाची अर्थव्यवस्था आणि नागरिकांचं आरोग्य लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाला कोणतीही चूक करायची नाही. डॉ. पॉल म्हणाले की देशात कोरोना चाचण्या योग्य प्रमाणात होत आहेत. परिस्थितीवर सरकार गांभीर्यानं लक्ष ठेवून आहे आणि गरजेनुसार निर्णय घेतले जातील. कोरोनाच्या याआधीच्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. असं असतानाही भारतानं कमबॅक करत जगासमोर आदर्श निर्माण केला आणि जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून देश उदयास आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन