शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 10:12 IST

मश्जीद उघडू द्या अन् नमाज पठण करण्यास परवानगी द्या, केली मागणी.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1 कोटी 50 लाख 96,317 इतकी झाली आहे. त्यापैकी 91 लाख 13,043 रुग्ण बरे झाले असून 6 लाख 19, 520 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 94,085 इतका झाला आहे. त्यापैकी 7 लाख 53,050 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 28,770 जणांचा जीव गेला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच देश लसींचा शोध लावत आहेत आणि काहींची चाचणी दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. पण, कोरोना हा आजार नसून अल्लाहनं आपल्या क्रुकर्माची दिलेली शिक्षा आहे, असे विधान समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर रहमान यांनी केलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांनी एक अजब लॉजिकही सांगितले.

बकरी ईदचा सण जवळ येत आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक ठिकाणी मश्जीद बंद आहेत. या पार्श्वभूमीवर शफीकुर रहमान यांनी अजब विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की,''बकरी ईदच्या निमित्तानं बाजारपेठा उघडल्या पाहिजेत. जेणेकरून लोकं बकरी खरेदी करून कुर्बानी देऊ शकतील. मश्जीद उघडल्या गेल्या पाहिजेत. तेथे लोकं एकत्र येऊन कोरोनाच्या नाश होण्यासाठी प्रार्थना करतील. कोरोनावर अजूनही कोणतेही औषध सापडलेले नाही. याचा अर्थ, हा आजार नव्हे, तर आपल्या चुकीच्या कामाची अल्लाहनं दिलेली शिक्षा आहे. त्यामुळे अल्लाहकडे प्रार्थना करणे, हाच त्यावरचा यशस्वी उपचार आहे.'' बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मश्जीदीत नमाज पठण करण्यासाठी परवानगी देणे आणि कुर्बानीसाठी व्यवस्था करण्याची मागणी इस्लामी शिक्षण संस्थान दारुल उलून देवबंद यांनी उत्तर प्रदेश राज्य सरकारकडे केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यासंदर्भात पत्रही लिहीलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSamajwadi Partyसमाजवादी पार्टी