शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

Corona Vaccination: १ मेपासून मेडिकलमध्ये मिळणार कोरोना लस? किती असणार किंमत?; जाणून घ्या सरकारचा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 9:30 AM

Corona Vaccination: १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण होणार; लस उत्पादकांना साठा बाजारात विकण्याची परवानगी

नवी दिल्ली: देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला. यामुळे १ मेपासून खुल्या बाजारात कोरोना लसींची विक्री करण्याची परवानगी कंपन्यांना मिळाली आहे. मात्र १ मेपासून कोरोनाची लस मेडिकलच्या दुकानांमध्ये मिळणार नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी लोकांना रुग्णालय किंवा लसीकरण केंद्रांमध्येच जावं लागेल. कोरोनाचा कहर! देशात किती टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, म्हणाले...लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचं पालन करूनच लसीकरण करावं लागलं. त्यामुळे कोरोना लस मेडिकलमध्ये मिळणार नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. लस घेतल्यानंतर कोणते प्रतिकूल परिणाम होतात, साईड इफेक्ट्स जाणवतात, त्याची नोंद कोविन ऍपवर ठेवली जाते. या माहितीचा अभ्यास केला जातो. तब्बल ५०० कोरोना रुग्णांचा जीव होता संकटात; अखेरच्या काही मिनिटांत घडला चमत्कारकोरोना लसी बाजारपेठेत येणार? किंमत किती असणार?कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्या एका डोसची किंमत ७०० ते १००० रुपयांच्या दरम्यान ठेऊ इच्छितात. सध्याच्या घडीला सरकारनं कोरोना लसीच्या एका डोसची किंमत २५० रुपये ठेवली आहे. खुल्या बाजारात कोविशील्ड लसीची किंमत प्रति डोस १ हजार रुपये इतकी असेल, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं आहे.लवकरच देशात स्पुटनिक व्ही लस उपलब्ध होईल. स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मितीसाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं रशियन कंपनीसोबत करार केला आहे. ही लस कोवॅक्सिन आणि कोविशील्डपेक्षा जास्त प्रभावी आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या एका डोसची किंमत ७५० रुपये असू शकते. मात्र याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. एका इंग्रजी वृत्तपत्रानं लसींची नेमकी किंमत जाणून घेण्यासाठी उत्पादकांशी संपर्क साधला. मात्र त्यांनी किंमत निश्चित झालं नसल्याचं सांगितलं. कंपन्यांना खासगी बाजारपेठेत किती डोस विकण्याची परवानगी देण्यात येईल, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. याबद्दलचं चित्र स्पष्ट झाल्यावर किंमत निश्चित केली जाईल, असं उत्पादकांनी सांगितलं.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या