Coronavirus: कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 06:57 PM2021-09-21T18:57:19+5:302021-09-21T18:58:36+5:30

दुसऱ्या लाटेनंतर देशातील एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनानं प्रभावित झाली आहे.

Covid-19 may be heading towards endemic stage in India, says virologist Gagandeep Kang | Coronavirus: कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा

Coronavirus: कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा

googlenewsNext

नवी दिल्ली – जगभरात कोरोना महामारीनं हाहाकार माजवला. लाखो लोकांचे जीव गेले. मागील २ वर्षापासून भारतातही कोरोनामुळे लोक दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. कोरोना कधी नष्ट होईल हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडला आहे. परंतु देशातील टॉप व्हॅक्सिन एक्सपर्टनं जो काही दावा केला आहे तो आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारा आहे. भारतात कोरोना व्हायरस संक्रमण एंडेमिसिटी दिशेने पुढे जात आहे. याचा अर्थ असा की देशात कधीही न संपुष्टात येणारा आजार बनणारा आहे असं व्हॅक्सिन एक्सपर्ट डॉक्टर गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे.

लोकांना व्हायरससोबत जगावं लागेल

डॉक्टर कांग म्हणाले की, स्थानिक पातळीवर कोरोना संक्रमण(Coronavirus) पुन्हा वाढल्यानं देशात कोरोना महामारी तिसऱ्या लाटेचं रुपांतर घेईल. परंतु ही लाट पूर्वीच्या लाटेप्रमाणे नसेल. कुठल्याही आजारासाठी एंडेमिक हा टप्पा आहे ज्यात लोकं त्या व्हायरससोबत जगणं शिकतात. ही महामारी खूप वेगळी आहे. मोठ्या संख्येने लोकांना त्याच्या विळख्यात अडकवत आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर गगनदीप कांग यांनी भारतातील कोविड १९ च्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

दुसऱ्या लाटेनंतर देशातील एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनानं प्रभावित झाली आहे. दुसऱ्या लाटेत आपण तेच आकडे आणि तोच पॅटर्न पाहिला का? त्यामुळे आगामी काळात त्याची शक्यताही कमी आहे. स्थानिक स्तरावर संक्रमण वाढेल परंतु ते कमी प्रमाण असेल परंतु देशभरात पसरेल. देशात तिसरी लाट येऊ शकते जर आपण सण उत्सावाबद्दल आपलं वागणं नाही बदललं असं त्यांनी सांगितले.

सध्यातरी कोरोना संपणार नाही

त्याचसोबत कोविड भारतात एंडेमिक स्थितीच्या दिशेने जात आहे. वेल्लोर क्रिश्चियन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर कांग म्हणाले की, जेव्हा तुमच्याकडे काही असं आहे जे नजीकच्या भविष्यात कधीही संपणारं नाही. मग ते एंडेमिक स्थितीच्या दिशेने जात आहे. सध्या आपण SARS COV 2 म्हणजे कोविड व्हायरस संपुष्टात आणण्यासाठी काम करत नाहीये कारण कोरोना एंडेमिक बनणार आहे.

दरम्यान, आपल्या देशात एंडेमिक आजार आहेत जसं इंफ्लूएंजा परंतु कोरोनामध्ये एंडेमिकसह महामारीचा धोकाही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कोरोना व्हायरसचा कुठलाही नवा व्हेरिएंट आला ज्याच्याशी लढण्याशी क्षमता आपल्या शरीराकडे नाही तर पुन्हा कोरोना महामारीचं रुप घेऊ शकतो. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तम व्हॅक्सिन विकसित करण्यावर भर द्यायला हवा असंही डॉ. गगनदीप कांग यांनी मुलाखतीत सांगितले.

Web Title: Covid-19 may be heading towards endemic stage in India, says virologist Gagandeep Kang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.