शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना संसर्गाला ब्रेक; ८१ दिवसांनंतर ६० हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 11:33 IST

Coronavirus Updates India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार ८७ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात. ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद.

ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ८७ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात. ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद.

Covid-19, Corinavirus in India Latest Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिस आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५८,४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,९८,८१,९६५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात रुग्ण बरे होण्याचा दरही आता वाढला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry of India) माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ५८,४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ८१ दिवसांनंतर देशात ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान ८७,६१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच १,५७६ रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. सध्या देशात ७ लाख २९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

२७,६२ कोटींपेक्षा अधिक लोकांचं लसीकरणभारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत २७.६२ कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक (Corona Vaccine) लस देण्यात आली आहे. शनिवारी देशात ३३,७२,७४२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात १८ ते ४४ या वयोगटातील २०,४९,१०१ नागरिकांना शनिवारी लसीचा पहिला डोस, तर ७८,३४९ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतHealthआरोग्य