शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारकडून अलर्ट जारी, 'या' लोकांना मास्क अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:23 IST

कर्नाटक सरकारने आता राज्यात मास्कबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी केरळमध्ये कोरोनाचे १११ नवीन रुग्ण आढळले. तर एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाचा हा नवा धोका पाहता केरळच्या शेजारील राज्य कर्नाटकानेही आपल्या राज्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कर्नाटक सरकारने आता राज्यात मास्कबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

कर्नाटक सरकारने ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. मात्र, सध्या सार्वजनिक ठिकाणी ये-जा करणाऱ्या लोकांवर कोणतेही बंधन नाही. राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी मास्क अनिवार्य केले आहे. तसेच, आरोग्य विभाग लवकरच कोविड संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.

कोरोना म्युटेशनवरून कोणीही काळजी करू नये, असेही आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे. डॉ. रवी यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार आणि श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्यांसाठी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक खाटा, पीपीई किट, टेस्टिंग किट तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे, केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तरच सार्वजनिक ठिकाणी कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या अशी परिस्थिती नाही आणि कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसKeralaकेरळKarnatakकर्नाटकHealthआरोग्य