शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मोठी बातमी! लहान मुलांच्या Covaxin लसीला लवकरच मंजुरी मिळणार, भारत बायोटेकनं DCGI पाठवला डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:22 IST

Covaxin Approval For 2-18 Age Group: भारतीय बनावटीची कोरोना विरोधी लस Covaxin ला लहान मुलांवरील वापरासाठी आपत्कालीन मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे

Covaxin Approval For 2-18 Age Group: भारतीय बनावटीची कोरोना विरोधी लस Covaxin ला लहान मुलांवरील वापरासाठी आपत्कालीन मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनीनं २ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणीचा संपूर्ण अहवाल ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) पाठवला आहे. भारत बायोटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली. डीसीजीआयकडून लवकरच अहवालाची तपासणी केली जाणार आहे. चाचणीचा अहवाल समाधानकारक वाटला तर लवकरच कोव्हॅक्सीनला लहान मुलांवरील वापरला आपत्कालीन मंजुरी मिळू शकते. असं झाल्यास देशात लहान मुलांना दिली जाणारी पहिली स्वदेशी लस भारताला उपलब्ध होणार आहे. 

तीन टप्प्यात झाली होती चाचणीएम्ससह देशातील विविध ठिकाणी लसीची लहान मुलांवर चाचणी घेण्यात आली होती. एकूण तीन टप्प्यात चाचणी घेतली गेली. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वर्षांमधील मुलांवर चाचणी केली गेली. त्यानंतर ६ ते १२ वयोगट आणि सर्वात शेवटी २ ते ६ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी केली गेली. देशात १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सीन लस घेता येत आहे. पण लहान मुलांसाठी अद्याप परवागनी देण्यात आलेली नाही. 

WHO कडूनही लवकरच मंजुरी मिळणारजागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कोव्हॅक्सीनला याच महिन्यात मंजुरी दिली जाईल असा विश्वास डॉ. एल्ला यांनी व्यक्त केला आहे. डब्ल्यूएचओला भारत बायोटेककडून आवश्यक अशी सर्व माहिती पुरविण्यात आल्याचं एल्ला यांनी सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार, भारत बायोटकनं डब्ल्यूएचओला ९ जुलै रोजी सर्व माहिती सुपूर्द केली आहे. जागतिक संघटनेला एखाद्या लसीचं परिक्षण करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. डब्ल्यूएचओकडून कोव्हॅक्सीनला मंजुरी मिळाली तर ही लस घेतलेल्या नागरिकांना क्वांराटइन नियमांचं पालन न करता परदेश यात्रा करणं शक्य होणार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या