चुलत भावाने घेतली याकूब मेमनची भेट
By Admin | Updated: July 20, 2015 23:59 IST2015-07-20T23:59:27+5:302015-07-20T23:59:27+5:30

चुलत भावाने घेतली याकूब मेमनची भेट
>कारागृहाबाहेर बंदोबस्त : पत्नी, मुलगी नागपुरला आलेच नाहीनागपूर : मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याची सोमवारी त्याचा चुलत भाऊ उस्मान मेमन आणि त्याचे वकील ॲड. अनिल गेडाम यांनी कारागृहात भेट घेतली. याकूबची पत्नी आणि मुलगी मात्र त्यास भेटण्यास आलेच नाहीत. कारागृहाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता व दोघेही प्रसार माध्यमाच्या संपर्कात येऊ नये, याचीही पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. याकूबच्या फाशीबाबत येथील तुरुंग प्रशासनाला आदेश मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर याकूबची पत्नी, मुलगी आणि अन्य नातेवाईक त्याची सोमवारी भेट घेणार असल्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळे सकाळी १० वाजेपासूनच मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींची गर्दी झाली होती. दुपारी एकच्या सुमारास याकूबचे स्थानिक वकील ॲड. गेडाम कारागृहात गेले. त्यांनी याकूबचा चुलत भाऊ उस्मान मेमन भेटायला आल्याची नोंद केल्यानंतर पावणेदोन वाजता उस्मान मेमनला मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडण्यात आले. पाऊण तासानंतर दोघेही पोलिसांच्या वाहनातूनच बाहेर आले. पोलिसांच्या वाहनातूनच दोघेही गेडाम यांच्या कार्यालयात गेले. उस्मान मेमनला कोणी ओळखत नसल्यामुळे तो सहजपणे प्रवेशद्वारावर आला होता. आत गेल्यानंतर तो याकूबचा नातेवाईक असल्याचे कळले. (प्रतिनिधी)------------------------19स्रँङ्म203.्नस्रॅ------------------------नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या याकूब मेमनच्या भेटीसाठी जाताना त्याचा चुलत भाऊ उस्मान मेमन.