शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांवरून कोर्टाची सरकारला नोटीस; चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 03:19 IST

संसदेने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे कृषी बाजार उत्पन्न समित्यांची यंत्रणाच खिळखिळी होणार आहे. कृषी उत्पादनाला योग्य तो भाव मिळावा म्हणून कृषी बाजार उत्पन्न समित्यांची स्थापना करण्यात आली होती.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अमलात आलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उत्तर द्यावे, यासाठी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोटीस बजावली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकारकडून चार आठवड्यांच्या आत उत्तर मागविले आहे. हमीभाव व कृषीसेवा कायदा, कृषी उत्पादनाचा व्यापार व वाणिज्यविषयक बाबी कायदा, जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा या तीन कायद्यांची २७ सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात आली.

या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभेतील खासदार मनोज झा, केरळमधील काँग्रेसचे लोकसभा खासदार टी.एन. प्रतापन, तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे राज्यसभा खासदार तिरुची शिवा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. तसेच अशीच एक याचिका राकेश वैष्णव यांनीही केली आहे. संसदेने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे कृषी बाजार उत्पन्न समित्यांची यंत्रणाच खिळखिळी होणार आहे. कृषी उत्पादनाला योग्य तो भाव मिळावा म्हणून कृषी बाजार उत्पन्न समित्यांची स्थापना करण्यात आली होती.घटक पक्षही झाले नाराजकेंद्र सरकारने अमलात आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमध्ये मोठे आंदोलन सुरू झाले. तीन कृषी विधेयके संसदेत संमत करू नका, अशी शिरोमणी अकाली दलाने केलेली मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमान्य केली होती. त्यामुळे या पक्षाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला. तरीही मोदींनी ही तीनही कृषी विधेयके संसदेत संमत करून घेतली. बिगरभाजपची सरकारे असलेल्या राज्यांनी या तीन कृषी कायद्यांना विरोध चालविला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयagricultureशेती