घटस्फोटांसाठी न्यायालय कारणे मागू शकत नाही- मद्रास हायकोर्ट
By Admin | Updated: August 11, 2016 04:49 IST2016-08-11T04:49:17+5:302016-08-11T04:49:17+5:30
एखादे दाम्पत्य जर सहमतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल करीत असेल, तर त्या घटस्फोटामागचे कारण जाणून घेणे हे न्यायालयाचे काम नाही

घटस्फोटांसाठी न्यायालय कारणे मागू शकत नाही- मद्रास हायकोर्ट
चेन्नई : एखादे दाम्पत्य जर सहमतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल करीत असेल, तर त्या घटस्फोटामागचे कारण जाणून घेणे हे न्यायालयाचे काम नाही. त्यामागील भावनांचा आदर करा, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात आपले मत व्यक्त केले.
विशेष म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने घटस्फोटाचा हा अर्ज फेटाळला होता. हा निर्णय रद्द करीत उच्च न्यायालयाने या दाम्पत्याचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.
न्या. के.के. शशीधरन आणि न्या. एल. गोकुलराज यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले आहे. जर वैवाहिक आयुष्यात विफलता आलेली असेल आणि दाम्पत्य आपल्या वैवाहिक जीवनाचा प्रवास थांबवू इच्छित असेल, तर त्यांच्या भावनांची कदर करायला हवी व त्यांना घटस्फोटासाठी परवानगी द्यायला हवी. (वृत्तसंस्था)