शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नाचा नवस पूर्ण; राम मंदिरापर्यंत 900 किमी चालत निघालं कपल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 17:19 IST

कडाक्याच्या थंडीत नवविवाहित कपल पायीच अयोध्येला जायला निघालं आहे. हे दोघेही तब्बल 900 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

राम मंदिरामुळे रामभक्तांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, कडाक्याच्या थंडीत नवविवाहित कपल पायीच अयोध्येला जायला निघालं आहे. हे दोघेही तब्बल 900 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. बिहारमधील कटिहार येथून पायी येत आहे. दोघे नुकतेच उत्तर प्रदेशातील बलिया येथे पोहोचले आहेत. रस्त्यात अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे.

कटिहारहून अयोध्येला जाणार्‍या रोशन कुमारने दिलेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह नीट संपन्न झाल्यास रामाच्या दर्शनासाठी पायी जाईन असं म्हटलं होतं. नुकतीच त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत आता तो पत्नी रोशनीसह अयोध्येला रवाना झाला आहे. दोघे मिळून 900 किलोमीटरचा प्रवास करतील.

"भगवान रामाकडे माझी एकच इच्छा आहे की, आमचं कुटुंब सुखी ठेव. देशवासीयांनाही खूश ठेव. थंडीमुळे त्रास होत असला तरी मनोकामना पूर्ण झाल्याच्या आनंदात राम मंदिरात नक्की जाणार आहे. रस्त्यात लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. 22 जानेवारीनंतर जेव्हाही संधी मिळेल तेव्हा दर्शन घेऊ" असं रोशनने सांगितलं. 

रोशन आणि त्याच्या पत्नीच्या पाठीवर बॅग आहे. बॅगेत प्रभू श्रीरामाचा ध्वज आहे. 'कटिहार ते अयोध्या' असा बॅनरही आहे. ते 22 जानेवारीपर्यंत अयोध्येला पोहोचतील अशी आशा आहे. यानंतर त्यांना जेव्हाही संधी मिळेल तेव्हा ते दर्शन घेणार आहेत.  रोशनी कुमारी म्हणते की, आमचं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजमध्ये बदलल्याबद्दल देवाचे आभार. घरच्यांनी अगदी सहज होकार दिला. त्यामुळे आमच्या इच्छेनुसार आम्ही दोघं पायीच अयोध्येला जात आहोत. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 23 जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले होणार आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याmarriageलग्न