दाम्पत्याने लावला २५ लाखांचा चुना

By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:19+5:302015-02-10T00:56:19+5:30

दाम्पत्याने लावला २५ लाखांचा चुना

The couple selected 25 lakhs | दाम्पत्याने लावला २५ लाखांचा चुना

दाम्पत्याने लावला २५ लाखांचा चुना

म्पत्याने लावला २५ लाखांचा चुना
बोगस दस्तऐवजावर प्लॉट विकला
नागपूर : यवतमाळ येथील एका दाम्पत्याने प्लॉटचे बोगस दस्तऐवज तयार करून वेकोलिच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला २५ लाखाने चुना लावला. पोलिसांनी दाम्पत्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र गायकवाड, त्याची पत्नी रश्मी ऊर्फ दीपाली गायकवाड, रा. अमराई दत्त चौक यवतमाळ, रश्मीचा भाऊ विनोद शेषराव गायकवाड रा. रघुजीनगर सक्करदरा, अरविंद महाकाळकर, रा. मनीषनगर, कृष्णा महल्ले रा. हुडकेश्वर आणि विजय नरडकर अशी आरोपींची नावे आहेत.
विनोद गायकवाड याच्या आईचा बेसा येथे प्लॉट होता. त्याच्या आईने खूप दिवसांपूर्वीच हा प्लॉट विकला होता. आईच्या मृत्यूनंतर विजयने बहीण रश्मी आणि जावई राजेंद्र यांच्या मदतीने या प्लॉटचे बोगस दस्तऐवज तयार केले. त्याने इतर आरोपीच्या मदतीने सेवानिवृत्त अधिकारी घनश्याम खरपुरिया (६०) रा. मनीषनगर यांना हा प्लॉट २५ लाख रुपयात विकला. त्यांनी सदर येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात प्लॉटची रजिस्ट्री केली. रजिस्ट्रीनंतर खरपुरिया यांनी प्लॉट आपल्या नावावर असल्याचा बोर्ड लावला. याची माहिती होताच विनोदच्या आईने ज्यांना हा प्लॉट अगोदरच विकला होता, त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The couple selected 25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.