जोडप्याला रात्रभर मारहाण, महिलेचे टक्कल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 03:52 IST2018-06-26T03:52:13+5:302018-06-26T03:52:16+5:30
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका जोडप्याला रात्रभर जबर मारहाण केली आणि महिलेच्या डोक्यावरील केस कापून टाकले.

जोडप्याला रात्रभर मारहाण, महिलेचे टक्कल!
नागाव (आसाम) : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका जोडप्याला रात्रभर जबर मारहाण केली आणि महिलेच्या डोक्यावरील केस कापून टाकले. आसामच्या नागाव जिल्ह्यातील झुमूरमूर येथे शनिवारी हा प्रकार घडला.
स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या तुबुकी खेड्यातील पुरूष शनिवारी रात्री झुमूरमूर खेड्यातील महिलेच्या घरी गेला. मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले व त्या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा त्यांनी आरोप केला.
पुरुषाने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु, ग्रामस्थांनी त्याला पकडले व त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना मारहाण केली. गावातील इतर महिलांनी त्या महिलेचे केस कापून टाकले. दोघांचे कपडेही फाडून टाकून रात्रभर त्यांना छळण्यात आले.
अगदी सकाळी गावकºयांनी पोलिसांना कळवले. हे दोघेही विवाहित असून ते आपापल्या जोडीदाराची फसवणूक करीत असल्याचा गावकºयांनी आरोप केला, असे पोलिस अधिकारी म्हणाला. जखमी अवस्थेत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. (वृत्तसंस्था)