नोट बंदीमुळे देशातील सेक्स बाजार पडले ओस

By Admin | Updated: November 11, 2016 12:43 IST2016-11-11T12:51:28+5:302016-11-11T12:43:57+5:30

मोदी सरकारने ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटेवर अचानक केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सोनागच्चीचा बाजार ओस पडला आहे.

The country's sex market fell in the wake of the ban | नोट बंदीमुळे देशातील सेक्स बाजार पडले ओस

नोट बंदीमुळे देशातील सेक्स बाजार पडले ओस

 ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. ११ - एकवेळ त्यांच्यावर नोटांचा पाऊस पडायचा. पण मोदी सरकारने ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटेवर अचानक केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सोनागच्चीचा बाजार ओस पडला आहे. भारतातील सर्वात मोठा रेड लाईट एरीया म्हणून ओळखल्या जाणा-या कोलकत्यातील सोनागच्ची बाजारालाही नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका बसला आहे. 
 
यापूर्वी १९९२ मध्ये बाबरी मशिद पडल्यानंतर डाव्या सरकारने संचारबंदी लावल्यानंतर इथे बाजार ओस पडला होता अशी माहिती इथल्या महिलांनी दिली. सोनागच्चीमध्ये ए ग्रेडच्या शरीरविक्रीय करणा-या महिलांना  ग्राहकांकडून बँक खात्यामध्ये ऑनलाइन पैसे जमा करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ए ग्रेड मध्ये मोडणा-या सेक्सवर्कर अर्ध्यातासासाठी तीन हजार रुपये घेतात. 
 
सोनागच्चीच्या गल्ल्या निर्मनुष्य झाल्या आहेत. मंगळवारी रात्री सरकारच्या या निर्णयाची माहिती मिळताच लगेचच इथे ५०० आणि १ हजारच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. डिएमएससीनुसार सोनागच्चीमध्ये शरीरविक्रीय करणा-या महिलांची अधिकृत आकडेवारी ११ हजार आहे. त्यातील चार हजार ए ग्रेडमध्ये मोडतात.  स्थानिकांनुसार शरीरविक्रीय करणा-या महिलांचा आकडा २० हजार आहे. बी ग्रेडच्या सेक्स वर्कर ५०० रुपये चार्ज करतात. त्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. 
 
 

Web Title: The country's sex market fell in the wake of the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.