भारताची एकचतुर्थांश जमीन वाळवंट होतेय

By Admin | Updated: June 19, 2014 04:14 IST2014-06-19T04:14:53+5:302014-06-19T04:14:53+5:30

भारताची सुमारे एक चतुर्थांश जमीन वाळवंट होणे आणि शेतजमिनीची प्रत घसरणे ही फार गंभीर समस्या बनली आहे.

The country's one-tenth of the land is desert | भारताची एकचतुर्थांश जमीन वाळवंट होतेय

भारताची एकचतुर्थांश जमीन वाळवंट होतेय

नवी दिल्ली : भारताची सुमारे एक चतुर्थांश जमीन वाळवंट होणे आणि शेतजमिनीची प्रत घसरणे ही फार गंभीर समस्या बनली आहे. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताच्या अन्नसुरक्षेला संभावित धोका आहे.
भारत जगाच्या भूप्रदेशापैकी केवळ दोन टक्के भूप्रदेशाने व्यापलेला आहे; पण येथे राहणाऱ्यांची संख्या १७ टक्के आहे. त्यामुळे जमिनीचा अतिवापर आणि अतिरिक्त चराई होते. शिवाय, पर्जन्यमानाच्या पद्धतीत सतत बदल होणे वाळवंटीकरणाचे प्रमुख कारण आहे.
जमीन पडीक होत आहे, तिची प्रत घसरत आहे, असे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.
बराचसा भाग वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे; पण ते थांबवल्या जाऊ शकते, असेही ते म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) २००७ च्या अहवालानुसार देशातील ६९ टक्के जमीन कोरडी, पाण्यासाठी अतिसंवेदशील आणि हवेमुळे घर्षण आणि दलदल झाली आहे.
राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही राज्ये कोरडा दुष्काळग्रस्त आहेत. कापूस आणि तेलबिया पिकविणारी ही राज्ये आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The country's one-tenth of the land is desert