देश-परदेश स्ट्रीप्स

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:48+5:302015-02-14T23:51:48+5:30

दोन भारतीयांचे मृतदेह आढळले

Country-Strife Strings | देश-परदेश स्ट्रीप्स

देश-परदेश स्ट्रीप्स

न भारतीयांचे मृतदेह आढळले
रियाध : सौदी अरेबियात दोन भारतीयांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आले. अल रुमेह जिल्ह्याच्या हॉलीडे रिर्जार्टच्या एका खोलीत हे मृतदेह आढळून आले. खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता आत मृतदेह आढळून आले.
----------
जॅकी चॅनपुत्र जेसीची व्यसनाबद्दल क्षमायाचना
बीजिंग : अमली पदार्थांच्या व्यसनावरून सहा महिन्यांची कैद भोगून हॉलीवूड स्टार जॅकी चॅन यांचा मुलगा जेसी चॅन शनिवारी तुरुंगातून सुटला. गजाआडून बाहेर येताच त्याने जनतेची माफी मागितली. शिक्षेने जीवन बदलल्याचे सांगून आणखी एक संधी देण्याची विनंतीही त्याने केली. पोलिसांनी जेसीला तैवानचा कलावंत चेन-तुंग याच्यासोबत ऑगस्टमध्ये अटक केली होती. त्याच्याकडून १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता.
-----
पाकिस्तानात न्यायमूर्ती स्फोटातून बचावले
कराची : पाकिस्तानातील बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शनिवारी शक्तिशाली बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावले. न्यायमूर्ती नूर मोहंमद मसकनजई यांचा ताफा खारन येथून नुश्कीला येत असताना रिमोट कंट्रोलद्वारे स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटामुळे पुलाचे अंशत: नुकसान झाले; मात्र न्यायमूर्ती थोडक्यात बचावले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

Web Title: Country-Strife Strings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.