शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 06:50 IST

६०१ रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त खाटा सज्ज; बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले

नवी दिल्ली : रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालये सज्ज असून अशा रुग्णांच्या तुलनेत बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या खूप जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. सद्य:स्थितीत एकूण २० टक्के रुग्ण गंभीर आहेत. अशांची संख्या १ हजार ६७१ आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. एकूण ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. श्वसनास अडथळा येतो, व्हेंटिलेटर लावावे लागते असे रुग्ण गंभीर श्रेणीत येतात. अशांची संख्या १६७१ आहे.

२९ मार्चला देशात ९७९ रुग्ण होते. त्यांच्यापैकी १८६ जण गंभीर होते. त्या वेळी राज्यांमधील १६३ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १४,९०० बेड्स उपलब्ध होते. ११ एप्रिलला गंभीर रुग्णांची संख्या १६७१ वर पोहोचली. मात्र त्यासाठी ६०१ डेडिकेटेड कोविड रुग्णालयांमध्ये १ लाख ५ हजारांपेक्षा जास्त बेड्स सज्ज आहेत. एम्स, सफदरजंग, मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचे उदाहरण त्यांनी दिले. एम्समध्ये २५० बेड्स तयार असून त्यातील ५० आयसीयू बेड्स आहेत. सफदरजंगमध्ये ही संख्या ५०० असून १०० आयसीयू बेड्स आहेत. लष्कराने दहा शहरांमधील रुग्णालयात ९ हजार बेड्स तयार केले आहेत. आॅर्डनन्स फॅक्टरीने ५० टेंट्स सज्ज ठेवले असून त्यात एकावेळी दोन जणांवर उपचार होऊ शकतील. ४८ तासांमध्ये ७४ जण कोरोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

देशात ९१८ रुग्ण : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९१८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या ९,२०४ वर गेली आहे. यापैकी २ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आतापर्यंत या संसर्गजन्य आजाराने भारतात ३२९ जण मरण पावले आहेत.राज्यातील नव्या २२१ रुग्णांपैकी १५२ जण मुंबईतीलच्राज्यात रविवारी कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील १५२ रुग्ण मुंबईतील असून आता राज्याची एकूण रुग्णसंख्या २ हजार २७ झाली आहे. राज्यात रविवारी २५ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील १६ मृत्यू मुंबईतील आहेत. राज्याचा कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही १५२ वर पोहोचला आहे.च्आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या