देशाला कृषी, औद्योगिक धोरणाची गरज : वैद्य
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
निमोणे : देशाला कृषी क्षेत्राची प्रगती करणार्या कृषी, औद्योगिक धोरणाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांनी केले. ज्या समाजामध्ये आचार-विचारांमध्ये मोठी दरी आहे तो समाज पुढे जाऊ शकत नाही. यासाठी बहुजन समाजातील युवकांनी जाणिवपूर्वक बदलावे लागेल, असे प्रतिपादन कष्टकर्यांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले.
देशाला कृषी, औद्योगिक धोरणाची गरज : वैद्य
निमोणे : देशाला कृषी क्षेत्राची प्रगती करणार्या कृषी, औद्योगिक धोरणाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांनी केले. ज्या समाजामध्ये आचार-विचारांमध्ये मोठी दरी आहे तो समाज पुढे जाऊ शकत नाही. यासाठी बहुजन समाजातील युवकांनी जाणिवपूर्वक बदलावे लागेल, असे प्रतिपादन कष्टकर्यांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले. पिंपरी-चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने बाभुळसर (ता. शिरूर) येथील उपसरपंच दशरथ फंड यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श मातोश्री श्रीमती हिराबाई मोरे यांना विठाई सन्मान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना यशवंत सन्मान, लोकमत कोल्हापूर संपादक राजा माने यांना चरित्रगं्रथासाठी, आबासाहेब बोर्हाडे यांना यशस्वी उद्योजक, पोलीस अधिकारी महेंद्र रोकडे यांना सामाजिक कृतज्ञता व दशरथ फंड यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी उद्धव कानडे यांनी डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत घेतली. या वेळी मातोश्री हिराबाई मोरे, डॉ. भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, डॉ. सदानंद मोरे, राजा माने, सुरेंद्र रोकडे, दशरथ फंड यांच्यासह अरुण गराडे, हनुमंत देशमुख, पुरुषोत्तम सदाफुले, बाजीराव सातपुते यांच्यासोबतच बाभुळसर खुर्द (ता. शिरूर) येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल फंड, एकनाथ वाळके, बाळासाहेब डाळिंबकर, उद्योजक शेखर डाळिंबकर, माजी सरपंच भिकाजी वाळके, अहिलाजी फंड, सुनील सातपुते, संभाजी डाळिंबकर, किसन फंड, नामदेव फंड, दीपक वाळके, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनाली फंड व मोठ्या प्रमाणावर शेतकरी, महिला व युवकवर्ग उपस्थित होता. (वार्ताहर)छायाचित्र ओळी : युवा नेतृत्व दशरथ फंड यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान करताना डॉ. भाई वैद्य व डॉ. बाबा आढाव व मान्यवर. (क्रेडिट : बाळासाहेब गायकवाड)-----------------०००००