कुटुंबापेक्षा देश महत्वाचा (२)

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:20+5:302015-08-27T23:45:20+5:30

मन आणि बुद्धी सीमेवरच

Country is important to the family (2) | कुटुंबापेक्षा देश महत्वाचा (२)

कुटुंबापेक्षा देश महत्वाचा (२)

आणि बुद्धी सीमेवरच
सुटी मिळाल्यावर सीमेवर असणारी स्थिती पाहता मेजर देव घरी येण्यास इच्छुक नव्हते. पण अधिकाऱ्यांच्या आदेशाला ते नाकारू शकत नव्हते. त्यामुळेच त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. येण्यापूर्वी त्यांनी टेलिग्राम पाठविला होता. तो मेजर घरी आल्यावर तीन दिवसांनी पोहोचला. पण त्यांच्या अचानक येण्याने कुटुंबीयांना आनंद झाला. ते घरी आले होते पण त्यांचे लक्ष घरात नव्हते. त्यांना विचारल्यावरही ते काहीच बोलले नाहीत. असेच जवळपास सहा दिवस गेलेत.
-----
वर्दी घातली आणि देशाच्या रक्षणासाठी निघाले
एक दिवस त्यांनी रेडिओवर बातमी ऐकली. त्यात सीमेवर होणाऱ्या घटनांची माहिती होती. त्यानंतर त्यांनी वर्दी परिधान केली आणि जाण्यासाठी तयार झाले. ते कुठे निघाले आहेत याची माहिती कुणालाच नव्हती. त्यानंतर त्यांनी कळविले की, ते नागपूर रेल्वे स्टेशनवरुन जी. टी. एक्स्प्रेसने रवाना झाले. कामावर रुजू झाल्यावर त्यांना १६ सप्टेंबर १९६५ रोजी सियालकोट सेक्टरमध्ये पाठविण्यात आले.
----------
तीन दिवसानंतर भेटला टेलिग्राम
सियालकोट सेक्टरला ते सीमेवर तैनात होते. देशाच्या सीमांचे रक्षण करताना त्यांनी प्राणांची आहुती दिली. पण त्यांच्या वीरमरणाची बातमी आम्हाला तीन दिवसानंतर टेलिग्रामनेच मिळाली. मला त्यांचा अभिमान वाटतो. मी स्वत:ला भाग्यवान समजते कारण माझ्या पतीमुळे मला वीर नारी हा सन्मान प्राप्त झाला. त्यांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. माझ्यासाठी ते आदर्श आहेत. ते मला पत्र पाठवायचे तेव्हा त्यात एखादा संदेश असा असायचा ज्यातून मला प्रेरणा मिळायची. आजही ही प्रेरणा मला मिळते.
------
लालबहादूर शास्त्रींनी पाठविले पत्र
मेजर सुरेंद्र देव मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झाले. त्यांच्या वीर मरणानंतर तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अनुराधा देव यांना एका पत्राद्वारे सांत्वना दिली होती. त्यांनी देशाच्या या वीरपुत्राला नमन केले.

Web Title: Country is important to the family (2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.