शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जेठमलानींच्या निधनानं देशानं असामान्य वकील गमावला- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 11:24 IST

प्रदीर्घ आजारानं राम जेठमलानींचं निधन

नवी दिल्ली: ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्याभरापासून जेठमलानी यांची प्रकृती खालावली होती. आज संध्याकाळी लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. जेठमलानी यांच्या निधनानं देशानं असामान्य वकील आणि आणि एक प्रतिष्ठीत व्यक्ती गमावल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. पंतप्रधानांनी ट्विट करुन जेठमलानींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.  राम जेठमलानींनी न्यायालय आणि संसद अशा दोन्ही ठिकाणी मोठं योगदान दिलं. त्यांचा स्वभाव अतिशय मिश्कील आणि साहसी होता. कोणत्याही विषयावर ते अतिशय निर्भीडपणे भाष्य करायचे. कोणाचीही तमा न बाळगता राम जेठमलानी त्यांच्या मनातील भावना व्यक्त करायचे. देशात आणीबाणी लागू असताना त्यांनी सार्वजनिक स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा कायम लक्षात राहील. गरजूंना मदत करणं हा त्यांचा स्वभाव होता, अशा शब्दांत मोदींनी जेठमलानी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.  मला अनेकदा राम जेठमलानी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या दु:खद क्षणी माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, असंदेखील पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं. गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील जेठमलानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जेठमलानी यांच्या निधनाचं वृत्त समजताच शहा त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. आपण एका प्रतिष्ठीत वकिलासोबतच एक महान व्यक्तीही गमावली, अशा शब्दांमध्ये शहांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जेठमलानींच्या निधनानं कायद्याच्या क्षेत्रातील व्यक्तींचं मोठं नुकसान झालं आहे. जेठमलानी यांचं कायद्याबद्दलचं ज्ञान असामान्य होतं. त्यासाठी ते कायम स्मरणात राहतील, असं ट्विट करुन शहांनी श्रद्धांजली वाहिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा