देश-परदेश : प्रसिद्ध भारतीय अमेरिकी डॉक्टरची मित्राकडूनच हत्या

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:46+5:302015-06-15T21:29:46+5:30

ह्युस्टन : प्रसिद्ध भारतीय अमेरिकी ह्रदयशल्यचिकीत्सक सुरेश गदासल्ली यांची त्यांच्या मित्राने गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. टेक्सास प्रांतातील ओडेसा येथे हा थरार घडला. डॉ. गदासल्ली यांनी ह्रदयरुग्णावर जगातील पहिली सिमल्टेनिअस् हायब्रिड रिव्हॅस्कूलरायजेशन (एकप्रकारची शस्त्रक्रिया) केले होते.

Country-Foreign: Famous Indian American doctor murdered by a friend | देश-परदेश : प्रसिद्ध भारतीय अमेरिकी डॉक्टरची मित्राकडूनच हत्या

देश-परदेश : प्रसिद्ध भारतीय अमेरिकी डॉक्टरची मित्राकडूनच हत्या

युस्टन : प्रसिद्ध भारतीय अमेरिकी ह्रदयशल्यचिकीत्सक सुरेश गदासल्ली यांची त्यांच्या मित्राने गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. टेक्सास प्रांतातील ओडेसा येथे हा थरार घडला. डॉ. गदासल्ली यांनी ह्रदयरुग्णावर जगातील पहिली सिमल्टेनिअस् हायब्रिड रिव्हॅस्कूलरायजेशन (एकप्रकारची शस्त्रक्रिया) केले होते.
गदासल्ली (५३) यांचे मित्र व रुग्ण अय्यासामी थंगम (६०) यांनी हेल्थी हार्ट सेंटर येथे गुरूवारी त्यांना गोळ्या घातल्या, असे ओडेसा पोलिस विभागाने म्हटले आहे. हल्ल्यानंतर थंगम यांनी खोलीचे दार बंद केले आणि त्यानंतर गोळी झाडल्याचा आणखी एक आवाज ऐकू आला, असे एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले. हे दोघे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि व्यवसायीक भागीदार होते. दोन्ही कुुटुंबांत एक दशकापासून घनिष्ठ संबंध होते. दोघांवरही बुधवारी ओडेसात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.
लॉरा आणि जॉर्ज बुश यांचे गृहशहर असलेले अडीच लाख लोकसंख्येचे हे शहर या घटनेने हादरून गेले आहे. हत्येमागील कारणांचा अंदाज वर्तविण्यास पोलिसांनी शुक्रवारी नकार दिला. थंगम यांच्यावर का उपचार करण्यात येत होते याचीही पोलिसांना माहिती नव्हती.
डॉ. गडासल्ली हे मूळचे कर्नाटकचे होते. बेळगावच्या जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ व्हिस्कोन्सीन मेडिकल स्कूल आणि मिलवावुकी येथील सिनाई समारिटान सेंटरमध्ये इंटरनल मेडिसीन तसेच कॉर्डिओलॉजीचे शिक्षण घेतले होते. १९९४ मध्ये ओडेसा, टेक्सास येथील मेडिकल सेंटर हॉस्पिटलमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती.
डॉ. गदासल्ली यांनी २००५ मध्ये एका रुग्णावर जगातील पहिले सिमल्टेनिअस् हायब्रिड रिव्हॅस्कूलरायजेशन केले होते. या शस्त्रक्रियेत एकाचवेळी बायपास आणि स्टेंट बदलण्याच्या प्रक्रियेचा समावेश होता व रोबोट प्रणालीचा वापर करून ती करण्यात आली होती.

Web Title: Country-Foreign: Famous Indian American doctor murdered by a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.