देश-परदेश : थोडक्यात महत्वाचे
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:04+5:302015-03-08T00:31:04+5:30
बॉम्बस्फोटात एक ठार

देश-परदेश : थोडक्यात महत्वाचे
ब म्बस्फोटात एक ठारकैरो : इजिप्तच्या गरबीया प्रांतातील अल महल्ला अल कोबरा शहरात शुक्रवारी रात्री बॉम्बस्फोट झाला. यात एक पोलीस ठार, तर इतर १० जण जखमी झाले. स्फोटानंतर रुग्णवाहिका पाठवून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळ्या घालून हत्याआसंसियन : ब्राझीलच्या पॅराग्वे शहरात रेडिओ पत्रकाराची हत्या करण्यात आली. गेरार्दो सर्वियन असे या पत्रकाराचे नाव आहे. दुचाकीवर आलेल्या बंदूकधार्यांनी त्यांच्यावर नऊ गोळ्या झाडल्या. मादक पदार्थ व शस्त्र तस्करीसाठी हे शहर कुख्यात आहे. ओलिस महिलेची सुटकाअबूजा : नायजेरियात अपहरण करण्यात आलेल्या अमेरिकी महिलेची सुटका करण्यात आली आहे. ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम करणार्या फिलीस सोर्टोर यांचे अज्ञात बंदूकधार्यांनी महिनाभरापूर्वी अपहरण केले होते. भ्रष्टाचाराचा आरोपन्यूयॉर्क : डेमोक्रॅ्रटिक पक्षाचे सिनेट सदस्य रॉबर्ट मेनेन्डेझ यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला जाण्याची चिन्हे आहेत. रॉबर्ट यांनी डेमोक्रॅटिक देणगीदाराचे हित जपण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे; मात्र रॉबर्ट यांनी हा आरोप फेटाळला आहे. भारतीयाला कारावासलंडन : नवी दिल्ली-लंडन विमानात शालेय विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या मनजितसिंग संधू याला चार महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला. पीडित विद्यार्थिनी (१४) त्याच्या पाठीमागील आसनावर बसलेली होती. गोळ्या घातल्याबीजिंग : चिनी रेल्वेस्थानकावर चाकूहल्ला झाल्यानंतर पोलिसांनी संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले. गुआंगझोऊ रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. चाकूहल्ल्यात नऊ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १८ जागा सत्ताधार्यांनाइस्लामाबाद : पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी (सिनेट) झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीगने ४८ पैकी १८ जागा जिंकल्या. त्यामुळे या पक्षाचे सभागृहातील प्रतिनिधित्व आता पाकिस्तान पीपल्स पार्टीएवढे झाले आहे.