देश-परदेश- पाक-लख्वी...
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:26+5:302015-03-14T23:45:26+5:30
देश-परदेश- पाक लख्वी, १४ मार्च २०१५

देश-परदेश- पाक-लख्वी...
द श-परदेश- पाक लख्वी, १४ मार्च २०१५सुटकेआधीच लख्वी पुन्हा स्थानबद्धसार्वजनिक सुरक्षा आदेश : पंजाब सरकारची कारवाईइस्लामाबाद : मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लख्वीची सुटका करण्याआधीच त्याला सार्वजनिक सुरक्षा आदेशातहत आणखी ३० दिवसांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. शुक्रवारी पाकिस्तानच्या एका हायकोर्टाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या गृह विभागाच्या एका अधिकार्याने सांगितले की, पंजाब सरकारने सार्वजनिक सुरक्षा आदेशातहत (एमपीओ) लख्वीला पुन्हा ३० दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला अदियाला तुरुंगातच ठेवण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाच्या विनंतीनुसार लख्वीला पुन्हा स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले, असे गृहविभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. लष्कर-ए-तोईबाचा कार्यकारी कमांडर लख्वी याच्या सुटकेचे आदेश इस्लामाबाद हायकोर्टाने दिल्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करीत यासंदर्भात शुक्रवारी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना नवी दिल्लीत पाचारण केले होते.लख्वीला पुन्हा ताब्यात घेऊन पंजाब सरकारने पाकिस्तानच्या संविधानाचे उल्लंघन केले आहे. एवढेच नाहीतर न्यायालयाचा अवमानही केला आहे. याविरुद्ध सोमवारी हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले.