पक्क्या अतिक्रमणांची मोजणी टपर्या, ओट्यांचे अतिक्रमण : बळीरामपेठेतील हॉकर्ससाठी गोलाणीत पुरेसे ओटे उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 00:47 IST2016-04-18T00:47:21+5:302016-04-18T00:47:21+5:30
जळगाव : मनपाच्या नगररचना विभागातर्फे आता बळीराम पेठेतील चौबे चौक ते शनिपेठ पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील पक्क्या अतिक्रमणांची मोजणी करण्यात आली. या रस्त्यावर टपर्या, ओटे, दुकानांच्या शेड आदी सुमारे २५ पक्की अतिक्रमणे असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी घाणेकर चौकापासून ते ब्रााणसभेपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांची मोजणी केली जाणार आहे.

पक्क्या अतिक्रमणांची मोजणी टपर्या, ओट्यांचे अतिक्रमण : बळीरामपेठेतील हॉकर्ससाठी गोलाणीत पुरेसे ओटे उपलब्ध
ज गाव : मनपाच्या नगररचना विभागातर्फे आता बळीराम पेठेतील चौबे चौक ते शनिपेठ पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील पक्क्या अतिक्रमणांची मोजणी करण्यात आली. या रस्त्यावर टपर्या, ओटे, दुकानांच्या शेड आदी सुमारे २५ पक्की अतिक्रमणे असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी घाणेकर चौकापासून ते ब्रााणसभेपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांची मोजणी केली जाणार आहे. हॉकर्ससाठी पुरेसे ओटेबळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर केले जाणार आहे. तसेच टॉवर चौक ते भिलपुरा पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील हॉकर्सचेही गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतर केले जाणार आहे. गोलाणीत ३०० ओटे शिल्लक आहेत. तर बळीरामपेठेतील हॉकर्सची संख्या मनपा दप्तरी असलेल्या नोंदीनुसार २७० आहे. त्यांना हे ओटे प्राधान्याने दिले जाणार आहेत. तर मोकळ्या जागांमध्ये पे आखून १२९ जागा देण्यात येणार आहेत. त्यात टॉवर चौक ते भिलपुरा पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यावरील हॉकर्सचे स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोलाणी मार्केटमध्ये काही पथदिवे बसविले आहेत. मात्र अद्यापही काही भागात रात्री खूप अंधार असतो. तेथे पथदिवे बसविण्याबाबत नगरसेवक अनंत जोशी यांनी विद्युत विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. मात्र निधीची अडचण दर्शविल्याने आयुक्त आल्यावर याविषयावर निर्णय होणार आहे. ------पुढचा टप्पा सुभाष चौक ते कोंबडी बाजारअतिक्रमण हटावच्या पुढच्या टप्प्यात सुभाष चौक ते कोंबडी बाजार रस्त्यावरील हॉकर्सचे स्थलांतर मुख्य टपाल कार्यालयासमोरील रस्त्यावर केले जाणार आहे.