शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या सभापतीच्या मुलाची आईकडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 13:19 IST

आईच्या कबुली जबाबानं पोलीस सुन्न

लखनऊ: उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजीत यादवच्या हत्येचं रहस्य उलगडलं आहे. रमेशच्या आईनंच त्याची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. अभिजीत मद्यपान करुन घरी येऊन धिंगाणा घालायचा, म्हणून त्याची हत्या केल्याचं त्याच्या आईनं पोलिसांना सांगितलं. अभिजीतच्या मद्यपानाच्या सवयीला कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली आईनं दिली आहे. रमेश यादव यांचा मुलगा अभिजीतचा मृतदेह रविवारी हजरतगंजमधील त्याच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला. या प्रकरणात यादव कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल केली. अभिजीत शनिवारी रात्री उशीरा घरी आला. त्यावेळी आपल्या छातीत दुखत असल्याचं त्यानं आईला सांगितलं. यानंतर आईनं त्याच्या छातीला मालीश केल्यावर अभिजीत झोपला. सकाळी त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या दृष्टीस पडला, अशी माहिती यादव परिवाराकडून पोलिसांना देण्यात आली. अभिजीतचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवून कुटुंबानं त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा संशय आल्यानं पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं. यातून अभिजीतचा मृत्यू गळा दाबण्यात आल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली. अभिजीतची आई आणि मोठ्या भावाची कसून चौकशी केल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला.  

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेश