कोथिंबीर गड्डी ३० रुपयाला

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:00+5:302015-06-12T17:38:00+5:30

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील आठवडे बाजारात पालेभाज्यांनी आठवड्यात उच्चांक गाठला. शिक्रापूर, पाबळ, मलठण, कोरेगाव, कारगाव आदी भागात आठवडे बाजारात कांथिबीरची एक गड्डी २५ ते ३० रुपयाला विकली गेली.

Cottage cheese 30 rupees | कोथिंबीर गड्डी ३० रुपयाला

कोथिंबीर गड्डी ३० रुपयाला

क्रापूर : शिरूर तालुक्यातील आठवडे बाजारात पालेभाज्यांनी आठवड्यात उच्चांक गाठला. शिक्रापूर, पाबळ, मलठण, कोरेगाव, कारगाव आदी भागात आठवडे बाजारात कांथिबीरची एक गड्डी २५ ते ३० रुपयाला विकली गेली.
मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग असलेल्या शिरूर तालुक्यातील आठवडेबाजार हे शेती मालासाठी मोठी बाजारपेठ आहे. मागील आठवडाभरात या भागात झालेल्या पावसाने त्याचबरोबरच चंदननगर, पुणे व पिंपळे जगताप आदी बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, करडई, चूका आदी पालेभाज्यांनाआठवडे बाजार चांगला भाव मिळाला २५ ते ०३ रुपये एका गड्डीची विक्री करण्यात आली तर गवार, दोडके, कारले, वांगी आदींचे भाव देखील सुमारे ५० ते ८० रुपये किलो होते.
फोटो ओळ : आठवडे बाजारात पालेभाज्यांची आवक कमी असल्याने २५ ते ३० रुपयांना एक गड्डी विकताना व्यापारी. (छाया- धनंजय गावडे)

Web Title: Cottage cheese 30 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.