शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार; ईडी बनलीय गुन्हेगारांची टोळी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 10:15 IST

प्रशांत भूषण : सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली प्रकरणाची चौकशी हवी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि खंडणीखोरी झाली आहे. हा गंभीर गुन्हा असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हायला हवी. मात्र, ही चौकशी सीबीआय किंवा अन्य केंद्रीय यंत्रणांमार्फत होऊ नये. तर न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या माध्यमातून आणि निवृत्त न्यायाधीशांमार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केली जावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केली. 

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे आयोजित केलेल्या पहिल्या कॉ. सुरेश धोपेश्वरकर व्याख्यानमालेत ‘निवडणूक रोखे - भारतीय लोकशाहीसमोरील एक आव्हान’ या विषयावर भूषण बोलत होते. यावेळी नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राइट टू इन्फॉर्मेशनचे समन्वयक शैलेश गांधी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज, बँक कर्मचारी संघटनेचे प्रा. देवीदास तुळजापूरकर आदी उपस्थित होते. नागरिकांकडून माहितीचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हिरावला जात आहे. मात्र लोकांना त्याची जाणीव नाही, अशी खंत शैलेश गांधी यांनी व्यक्त केली. 

भूषण म्हणाले...    भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कंपन्यांनी दिले. त्यानंतर कंपन्यांना जवळपास ३ लाख ६ हजार कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली.     निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे मिळाल्यावर सरकारी धोरणातही बदल झाले आहेत. त्याची अनेक उदाहरणे आहेत.    देशातील २५ नेत्यांविरोधात ईडी, आयटी या केंद्रीय संस्थांच्या कारवाया सुरू होत्या. मात्र या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यावर २३ नेत्यांच्या केसेस माघारी घेण्यात आल्या.     ईडी आणि अन्य केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी दिल्यावर कारवाया थंडावल्या.    दिल्ली मद्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या ऑरोबिंदो फार्मा कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. त्यानंतर त्या कंपनीच्या संचालकाला माफीचा साक्षीदार केले. - या मुख्य आरोपीच्या केवळ जबाबावर अरविंद केजरीवाल यांना अटक केली. अशा पद्धतीने आरोपीच्या जबाबावर मुख्यमंत्र्यांना अटक केली जाऊ शकत नाही.

‘ईडी बनलीय गुन्हेगारांची टोळी’सरकारी धोरणे बदलण्यासाठी आणि विविध कंत्राटे मिळविण्यासाठी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून लाचखोरी करण्यात आली आहे. त्यामुळेच केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांना ९० टक्के रोखे मिळाले. यातील ५० टक्के रोखे हे एकट्या भाजपला मिळाले आहेत. ईडी ही संघटित गुन्हेगारांची टोळी बनली असल्याचा गंभीर आरोप प्रशांत भूषण यांनी रविवारी केला. भूषण आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी पत्रपरिषदेत एसआयटी चौकशीची मागणी करताना म्हटले की, निवडणूक रोख्यांतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीसाठी आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Courtन्यायालयElectionनिवडणूक