शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; वयाच्या 43व्या घेतला अखेरचा श्वास
3
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
4
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
5
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
6
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
7
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
8
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
9
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
10
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
12
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
13
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
14
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
15
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
16
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
17
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
18
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
19
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
20
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाच्या कामात ३०० कोटींचा भ्रष्टाचार; ग्रामीण विकास खात्याच्या सर्व्हेतील माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:12 IST

ग्रामीण विकास मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात हा भ्रष्टाचार आढळून आला आहे.

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत (मनरेगा) केलेल्या कामात ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आढळून आला आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात हा भ्रष्टाचार आढळून आला आहे.

सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण विकास मंत्रालयाने मनरेगा कायद्यांतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षण केले होते. २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५५ जिल्ह्यांतील १००० कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली गेली. याशिवाय स्थानिक लेखापरिक्षणात सुद्धा या कामात व्यापक अनियमितता दिसून आली.

२९३ कोटी रुपयांची केली वसुली

सूत्रांनुसार, सामाजिक लेखापरिक्षणातील ११ लाख चार हजार ६२७ प्रकरणांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली असून, यात ३०२ कोटी ४५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातील २९३ कोटी ४७ लाख रुपयांची वसुली सुद्धा करण्यात आली, हे विशेष. 

८० वर्षांच्या वृद्धांना मजुरी, जीएसटीतील दस्तावेज गायब, विनापरवाना कामे

गोपनीय अहवालानुसार, फाइलवर कामांची नोंद आहे; पण प्रत्यक्षात काम न होणे, विनापरवानगी कामे करणे, आर्थिक अनियमितता, आर्थिक निधीचा गैरवापर आणि कनिष्ठ पातळीवरील मंजुरी मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक कामांचे विभाजन लहान-सहान कामांमध्ये करणे, ब्लॅकलिस्टेड कंत्राटदाराला सतत काम देणे, संशयास्पद खरेदी प्रक्रिया, बनावट बिले तयार करणे आणि फायलींमधून रॉयल्टी पेमेंट आणि जीएसटीशी संबधित दस्तावेज गायब आहेत. यातही विशेष म्हणजे, काही ठिकाणी ६० वर्षांपेक्षा जास्त आणि काही प्रकरणांमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त लोकांना मजुरी देण्यात आली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : MNREGA Scam: ₹300 Crore Corruption Uncovered in Rural Development Survey

Web Summary : A rural development ministry survey revealed ₹300 crore corruption in MNREGA works. Irregularities include fake bills, missing documents, and wages to ineligible individuals. ₹293 crore has been recovered.
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार