पोटगी देण्यास कसूर : दोघांना कारावास

By Admin | Updated: August 12, 2015 23:54 IST2015-08-12T23:54:33+5:302015-08-12T23:54:33+5:30

पोटगी देण्यास कसूर

Corruption: Both of them imprisoned | पोटगी देण्यास कसूर : दोघांना कारावास

पोटगी देण्यास कसूर : दोघांना कारावास

टगी देण्यास कसूर
दोघांना कारावास
नागपूर : पोटगी देण्यास कसूर केल्याने वेगवेगळ्या दोन प्रकरणांमध्ये दोन जणांना कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली.
गिट्टीखदान भागातील मनोज सिरिया नावाच्या इसमाने १४ महिन्याची पोटगीची रक्कम १६ हजार ८०० रुपये आपल्या पत्नीला देण्यास टाळाटाळ केली. तो पेंटिंगची कामे करतो. पोटगी देण्यास तो सक्षम असतानाही त्याने न्यायालयाचा आदेश पाळला नाही. न्यायालयाच्या आदेशान्वये गिट्टीखदान पोलिसांनी त्याला पकडून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४० दिवसांचा कारावास सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली. या इसमाने पोटगीची संपूर्ण रक्कम अदा केल्यानंतर त्याला सोडण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
दुसरे प्रकरण अजनी भागातील आहे. रवींद्र नावाच्या या प्रतिवादीने पाच महिन्याच्या पोटगीची रक्कम २७ हजार ५०० रुपये पत्नीला आणि मुलांना देण्यास टाळटाळ केली. तो मनपात सुपरवायझर आहे. अजनी पोलीस ठाण्याचे नायक शिपाई बेनीराम यांनी त्याला पकडून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ५० दिवसांचा कारावास सुनावला. संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतरच त्याला सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Web Title: Corruption: Both of them imprisoned