सुधारित/ कुत्रा फाशी संघ नेत्याच्या स्मृतिदिनी तीन कुत्र्यांना दिली फाशी केरळमध्ये सूडाचे प्रदर्शन : विजेच्या खांबावर लटकवून व्यक्त केला रोष

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30

कन्नूर : केरळच्या कन्नूर जिल्‘ातील पूर्व कथीरूर भागात रा.स्व. संघाचे नेते ई. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मंगळवारी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी १ सप्टेंबर रोजी उक्कास मो˜ा गावाजवळ काही समाजकंटकांनी कारवर बॉम्ब फेकल्यानंतर ती विजेच्या खांबावर आदळून मनोज यांचा मृत्यू झाला. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित प्रार्थनेसाठी जात असलेल्या कार्यकर्त्यांना त्याच विजेच्या खांबाला कुत्र्यांचे मृतदेह लटकविलेलेे आढळून आले.

Corrected / hanging dog at the memorial of a dog hanging party leader | सुधारित/ कुत्रा फाशी संघ नेत्याच्या स्मृतिदिनी तीन कुत्र्यांना दिली फाशी केरळमध्ये सूडाचे प्रदर्शन : विजेच्या खांबावर लटकवून व्यक्त केला रोष

सुधारित/ कुत्रा फाशी संघ नेत्याच्या स्मृतिदिनी तीन कुत्र्यांना दिली फाशी केरळमध्ये सूडाचे प्रदर्शन : विजेच्या खांबावर लटकवून व्यक्त केला रोष

्नूर : केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पूर्व कथीरूर भागात रा.स्व. संघाचे नेते ई. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मंगळवारी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी १ सप्टेंबर रोजी उक्कास मोट्टा गावाजवळ काही समाजकंटकांनी कारवर बॉम्ब फेकल्यानंतर ती विजेच्या खांबावर आदळून मनोज यांचा मृत्यू झाला. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित प्रार्थनेसाठी जात असलेल्या कार्यकर्त्यांना त्याच विजेच्या खांबाला कुत्र्यांचे मृतदेह लटकविलेलेे आढळून आले.
तणाव टाळण्यासाठी या कार्यकर्त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. या कृत्यामागे माकप असल्याचा आरोप भाजप-रा. स्व. संघाच्या नेतृत्वाने केला आहे. संघ परिवारात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत असल्यामुळे धास्तावलेल्या माकपने अशांतता निर्माण करण्यासाठी कारवाया चालविल्या असल्याचे संघाचे विभाग कार्यवाहक व्ही. शशीधरन यांनी म्हटले.
-------------------------
सूडबुद्धी कायम
दरम्यान तपासाचा भाग म्हणून कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून कथीरूर पोलिसांनी तपास चालविला असल्याचे सूत्रांनी नमूद केले. अलीकडे कन्नूर येथे माकप आणि भाजप समर्थकांमध्ये हिंसक संघर्षाची मालिकाच पार पडली आहे. मनोज हे रा. स्व. संघाचे कन्नूर जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख होते. १९९९ मध्ये माकपचे नेते पी. जयराजन यांच्यावर जीवघेण्या हल्ल्यात त्यांना आरोपी बनविण्यात आले होते. मनोज यांच्या हत्येचा तपास सोपविण्यात आलेल्या सीबीआयने यापूर्वीच जयराजन यांची चौकशी केली आहे. सूडाच्या राजकारणातून मनोज यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने चालविला आहे.
----------------------
कोट
समाजकंटकांनी मनोज यांच्या कारवर बॉम्ब फेकून तालिबानी पद्धतीने हत्या घडविली होती. या घटनेला वर्ष उलटले असतानाही माकपने सूडबुद्धी कायम ठेवत प्रदर्शन चालविले आहे.
-के. रणजित, भाजपचे जिल्हाध्यक्ष.

Web Title: Corrected / hanging dog at the memorial of a dog hanging party leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.