सीसीटीव्ही फुटेजचा सुधारुन तपास

By Admin | Updated: June 16, 2014 03:52 IST2014-06-16T03:52:02+5:302014-06-16T03:52:02+5:30

नेस वाडिया नेस वाडिया आणि प्रीती झिंटा प्रकरणी पोलिसांच्या हाती आलेले वानखेडे स्टेडियममधील ३० मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने त्याचा दर्जा सुधारण्यासाठी पाठवले जाणार

Correct investigation of CCTV footage | सीसीटीव्ही फुटेजचा सुधारुन तपास

सीसीटीव्ही फुटेजचा सुधारुन तपास

डिप्पी वांकाणी, मुंबई
उद्योगपती नेस वाडिया नेस वाडिया आणि सिनेअभिनेत्री प्रीती झिंटा प्रकरणी पोलिसांच्या हाती आलेले वानखेडे स्टेडियममधील ३० मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने त्याचा दर्जा सुधारण्यासाठी पाठवले जाणार आहे. त्यानंतर, त्याचा अधिक अभ्यास करण्यात येईल.
या फुटेजमध्ये वाडिया आणि झिंटा यांचे चेहरे नीट ओळखता येत नसल्याने अन्य कोनांतील फुटेजही उपलब्ध आहेत का, अशी विचारणा पोलिसांनी बीसीसीआयकडे केली आहे. वाडिया यांना ओळखताना गल्लत होत आहे. काहींनी फुटेजमध्ये काळा टी-शर्ट तर काहींनी लाल टी-शर्ट घातलेली व्यक्ती वाडिया असल्याचे म्हटले.
या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले की, आमच्या हाती आलेले सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट आहे आणि त्यात प्रेक्षक जल्लोष करतानाचे चित्रण आहे. त्यामुळे आता संघांचे मालक जेथे बसतात त्या खास कक्षाचे सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासले जाणार आहे. तसेच झिंटा यांनी तक्रारीत साक्षीदार म्हणून कोणाचे नाव घेतलेले नाही. त्यांनी जबाब दिल्यावरच साक्षीदारांना बोलावणे शक्य होईल.
झिंटा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आयपीएल-७ स्पर्धेच्या ३० मे रोजी पंजाब इलेव्हन व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यावेळी रात्री साडेआठच्या सुमारास वाडिया आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा वाद झाला. त्यात मध्यस्थी केली असता वाडिया यांनी झिंटा यांना चारचौघांत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. त्यानुसार, पोलिसांनी स्टेडियमचे फुटेज तपासणीसाठी मिळवले होते. पण ते धूसर आहे.
प्रितीचा नव्याने जबाब नोंदविणार
प्रीती झ्ािंटा हिने नेस वाडिया यांच्याविरुद्ध दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीप्रकरणी तिचा नव्याने जबाब नोंदवण्यात येणार आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घेतलेले दोघा साक्षीदारांचे जबाब व स्टेडियमवरील सीसीटीव्ही फुटेजची सीडी पाहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रिती सध्या लॉस एंजलिसमध्ये असून तेथून परतल्यानंतर तिचा जबाब घेण्यात येईल.

Web Title: Correct investigation of CCTV footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.