खुलासा सादर करण्यास नगरसेवकांनी मागितली मुदतवाढ
By Admin | Updated: April 5, 2016 00:14 IST2016-04-05T00:14:59+5:302016-04-05T00:14:59+5:30
जळगाव : क्षेत्र सभा प्रकरणी आयुक्तांनी दिलेल्या नोटीसवर खुलासा सादर करण्यास एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी मनपातील ७३ नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे.

खुलासा सादर करण्यास नगरसेवकांनी मागितली मुदतवाढ
ज गाव : क्षेत्र सभा प्रकरणी आयुक्तांनी दिलेल्या नोटीसवर खुलासा सादर करण्यास एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी मनपातील ७३ नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. क्षेत्र सभा न घेतल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेतील आदेशानुसार मनपा आयुक्तांनी ७५ पैकी ७३ नगरसेवकांना आठवड्यात लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली होती. यावर या सर्व नगरसेवकांनी सोमवारी गटनिहाय अर्ज देऊन खुलासा सादर करण्यास महिन्याची मुदतवाढ मिळावी अशी विनंती करणारा अर्ज सादर केला आहे.