शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

CoronaVirus News: मजूर चोर, दरोडेखोरांसारखे पळताहेत; भाजपाच्या राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 12:37 IST

CoronaVirus News: राज्यमंत्र्यांच्या विधानाचा विरोधकांकडून समाचार; काँग्रेस, सपाची टीका

लखनऊ: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. उद्योगधंदे ठप्प असल्याचा सर्वाधिक फटका कामगार आणि मजूर वर्गाला बसला आहे. लॉकडाऊन वाढतच चालल्यानं हातावर पोट असलेले लाखो मजूर आपल्या राज्यांच्या दिशेनं चालू लागले आहेत. शेकडो अंतर पायी तुडवत निघालेल्या मजुरांचे हृदयद्रावक फोटो, त्यांच्या व्यथा समोर येत आहेत. ते पाहून अनेक जण हळहळले. मात्र भाजपाच्या एका नेत्यानं या मजुरांची तुलना चोर आणि दरोडेखोरांशी केली आहे. त्यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.उत्तर प्रदेशातले भाजपाचे नेते आणि राज्यमंत्री चौधरी उदयभान सिंह यांनी गावी परतण्यासाठी पायपीट करणाऱ्या मजुरांबद्दल अतिशय वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी मजुरांची तुलना थेट चोर आणि दरोडेखोरांशी केली. या स्थलांतरित मजुरांसाठी सरकार खाण्यापिण्याची व्यवस्था करतंय. मात्र तरीही ते शेतांमधून चोर, दरोडेखोरांसारखे जात आहेत, असं सिंह म्हणाले. सिंह उत्तर प्रदेश सरकारमध्ये सूक्ष्य, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे राज्यमंत्री आहेत. राज्यमंत्री चौधरी उदयभान सिंह यांच्या विधानावर विरोधकांनी कडाडून टीका केली. काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं सिंह यांच्या विधानाचा निषेध केला. चौधरी यांचं विधान मजुरांच्या गरिबीची चेष्टा करणारं असल्याचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अजय लल्लू म्हणाले. लोकप्रतिनिधी, सरकार मजुरांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करुन त्यांच्यावर उपकार करत नाहीत. चौधरी यांचं विधान अतिशय लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया समाजवादी पार्टीच्या प्रवक्त्या जुही सिंह यांनी दिली. मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा