शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: दिल्लीत जगातील सर्वांत मोठे ‘कोविड’ शुश्रूषा केंद्र सुरू, १० हजार ‘आयसोलेशन खाटां’ची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 05:22 IST

या ठिकाणी एकूण १० हजार खाटांची सोय असून, त्यांचा वापर प्रामुख्याने सौम्य लक्षणे दिसणाऱ्या किंवा लक्षणे न दिसणा-या राजधानीतील कोरोना रुग्णांसाठी ‘आयसोलेशन सेंटर’ म्हणून केला जाईल.

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर येथे राधा स्वामी सत्संग ब्यास या धार्मिक संस्थेच्या भव्य पटांगणावर उभारलेल्या जगातील सर्वांत मोठ्या ‘कोविड-१९’ शुश्रूषा केंद्राचे रविवारी उद््घाटन झाले. या ठिकाणी एकूण १० हजार खाटांची सोय असून, त्यांचा वापर प्रामुख्याने सौम्य लक्षणे दिसणाऱ्या किंवा लक्षणे न दिसणा-या राजधानीतील कोरोना रुग्णांसाठी ‘आयसोलेशन सेंटर’ म्हणून केला जाईल.‘सरदार पटेल कोविड केअर सेंटर अ‍ॅण्ड हॉस्पिटल’ असे नामकरण केलेल्या या अत्यंत आधुनिक व सर्व सोयींनी परिपूर्ण अशा सुविधा केंद्राचे उद््घाटन दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही या केंद्रास नंतर स्वतंत्रपणे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी करूनकौतुक केले.राधास्वामी सत्संग व्यास संस्थेने एरवी सत्संग मेळाव्यांसाठी वापरले जाणारे पटांगण यासाठी उपलब्ध करून दिले. पूर्णपणे वातानुकुलित लोखंडी मंडपाच्या स्वरूपात उभारलेल्या या हंगामी इस्पितळवजा शुश्रूषा केंद्राचा एकूण परिसर १,७०० फूट लांब व ७०० फूट रुंद म्हणजे फूटबॉलच्या २० मैदानांएवढा आहे. येथील एकूण १० हजार खाटा विविध वॉर्डमध्ये विभागलेल्या असून यातील प्रत्येक वॉर्डला लडाखच्या गलवान खोºयात चीनशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय लष्कराच्या २० जवानांची नावे देण्यात आली आहेत. दिल्ली प्रशासनाने सैन्यदलांच्या मदतीने अवघ्या १२ दिवसांत हे सुसज्ज केंद्र उभे केले आहे.या शुश्रूषा केंद्रातील पहिल्या दोन हजार खाटा वापरासाठी लगेच उपलब्ध होणार असून त्यांचे वैद्यकीय व्यवस्थापन भारत-तिबेट सीमा पोलीस या निमलष्करी दलाचे १७० डॉक्टर व ७०० नर्स व अन्य कर्मचारी करतील. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ९७,२०० वर पोहोचली असताना हे केंद्र सुरू झाल्याने मोठी सोय होणार आहे. नव्या कोरोना रुग्णांचे दैनिक प्रमाण हळूहळू कमी होत आहे. गेल्या आठवड्यात रोजच्या नव्या रुग्णांची संख्या सरासरी ३, ४०० होती. ती आता कमी होऊन २,६२८वर आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारत