शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
3
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
4
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
5
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
6
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे ट्रॅव्हल अम्मा?
7
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
8
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
9
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
10
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
11
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
14
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
15
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
16
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
17
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
18
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
19
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
20
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल

CoronaVirus लॉकडाऊनमध्ये EPF खात्यातून तत्काळ पैसे काढा; या आहेत अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 17:40 IST

कोरोनाशी लढताना किंवा घरात राहिल्याने पैशांची गरज लागणार आहे. यासाठी ईपीएफओ धावून आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करावा लागल्याने अनेकांचा रोजगार बुडालेला आहे. पंतप्रधानांनी कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पगार करावा असे आवाहन केले आहे. मात्र, याचबरोबर करोडो नोकरदारांना मोठा दिलासाही दिला आहे. नोकरदारांच्या पीएफ खात्यामध्ये कंपनी आणि कर्मचाऱ्यांचा पगारातील हप्ता असा २४ टक्के पीएफ जमा करण्यात येणार आहे. याचबरोबर आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली होती. 

कोरोनाशी लढताना किंवा घरात राहिल्याने पैशांची गरज लागणार आहे. यासाठी ईपीएफओ धावून आले आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या आदेशांनुसार कोणताही कर्मचारी त्याच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम विनापरतावा काढू शकणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली होती.ईपीएफओने नुकतेच पैसे काढण्याच्या अटींमध्ये मोठे बदल केले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे बदल बाजुला करत सर्वांसाठी पीएफ काढण्याचा पर्याय ठेवला आहे. याद्वारे एकूण जमा रकमेच्या ७५ टक्के किंवा तीन महिन्यांचा पगार यापैकी जेवढी रक्कम कमी असेल ती काढता येणार आहे. 

कामगार मंत्रालयाने २८ मार्चला याबाबतची सूचना जारी केली आहे. यानुसार तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता किंवा ईपीएफ खात्यामध्ये जमा असलेल्या एकूण रकमेपेक्षा ७५टक्के रक्कम यापैकी जी रक्कम कमी भरेल ती काढण्याची परवानगी दिली आहे. महत्वाचेम्हणजे ही रक्कम पुन्हा परत करण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकारने कोरोनाला महामारी घोषित केले आहे. यामुळे देशभरातील कारखाने, कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी ही रक्कम काढू शकणार आहेत. यासाठी कोणालाही अडविले जाणार नाही. यासाठी ईपीएफ योजना, 1952 चा अनुच्छेद 68 एल (3) जोडण्यात आला आहे. यानुसार हा आदेश कर्मचारी भविष्य निधी कोष २८ मार्चपासून लागू झाला आहे. 

अधिसूचना काढल्यानंतर ईपीएफओने त्यांच्या देशभरातील कार्यालयांना आदेश देत कोणत्याही कर्मचाऱ्याने ही रक्कम काढण्यासाठी अर्ज केला तर त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. कारण संकटाच्या काळात त्यांना मदत मिळू शकेल, अशा सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :Employeeकर्मचारीProvident Fundभविष्य निर्वाह निधीcorona virusकोरोना वायरस बातम्या