शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार; लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 14:51 IST

देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की मर्यादित भागात लॉकडाऊन सुरू राहणार याबाबत देशभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ठळक मुद्देदेशव्यापी लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना पुन्हा एकदा संबोधित करून लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यतापंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. दरम्यान, लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. मात्र देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की मर्यादित भागात लॉकडाऊन सुरू राहणार याबाबत देशभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना पुन्हा एकदा संबोधित करून लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी लॉकडाऊनच्या नियमात काही महत्त्वपू्र्ण बदल होण्याची शक्यता आहे. आवश्यक सेवा वगळून आंतरराज्यीय वाहतुकीवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आर्थिक मंदीचा विचार करता काही विशिष्ट्य क्षेत्रातील उद्योगांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. 

कोरोना विषाणूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुस्ती आली आहे, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरण अहवालात म्हटले आहे.  लॉकडाऊनमुळे विमान वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाच्या पालनासह देशातील हवाई वाहतुकीला परवानगी मिळू शकते. दरम्यान, बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन हटवणे शक्य नसल्याचे म्हटले होते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे रक्षण करण्यास पंतप्रधान मोदींचे प्राधान्य असल्याचे सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झालेल्या काही नेत्यांनी सांगितले होते. तसेच कोरोनाची साथ येऊन गेल्यानंतर देशातील जीवन पूर्वीसारखे राहणार नाही. तसेच जनतेला आपले वैयक्तिक आचरण आणि सामाजिक आचरणात बदल करावे लागतील,  असे मत या नेत्यांनी मांडले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत