coronavirus : कोण आहे तबलीग जमात? काय आहे मरकजचा अर्थ? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 11:02 AM2020-04-01T11:02:57+5:302020-04-01T12:27:32+5:30

देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना दिल्लीतील घटनाक्रमामुळे तबलीग जमात आणि मरकज चर्चेचा विषय ठरली आहे.

coronavirus: Who is the Tablighi jamaat ? What does Markaz mean? BKP | coronavirus : कोण आहे तबलीग जमात? काय आहे मरकजचा अर्थ? जाणून घ्या

coronavirus : कोण आहे तबलीग जमात? काय आहे मरकजचा अर्थ? जाणून घ्या

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मरकजमधून सुमारे 1900 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे तसेच तेथील 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे कल समोर आले होते. तसेच या मरकजमधील अनेकजणांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे आणि या मरकजमध्ये आलेले अनेकजण देशाच्या विविध भागात गेल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना कालच्या घटनाक्रमामुळे तबलीग जमात आणि मरकज चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र तबलीग जमात आणि मरकजबाबत फारशी माहिती अनेकांना नाही.

तबलीग जमातचा अर्थ सांगायचा तर  तबलीग म्हणजे अल्ला आणि कुराण, हाडीसमधील शिकवण इतरांपर्यंत पोहोचवणे. तर जमात म्हणजे गट. अर्थात तबलिगी जमात म्हणजे एका गटाची जमात होय. 

तर तबलिगी मरकज याचा अर्थ इस्लामची शिकवण इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे केंद्र. सुमारे 75 वर्षांपूर्वी मेवातमधील मौलाना इलियास साहेब यांनी मरकजची स्थापना केली होती. भारतातील अज्ञानी मुस्लिमांना इस्लामने बनवलेला रस्ता आणि नमाजच्या मार्गावर आणणे हा त्यामागचा हेतू होता. भरकटलेल्या लोकांनी नमाज पठण करावे, रोजे ठेवावेत, वाईटापासून दूर राहावे आणि सत्याचा मार्ग पत्करावा हा मरकजच्या स्थापनेचा हेतू होता. 

दरम्यान, मरकजच्या या कार्याला अल्पावधीतच खूप प्रसिध्दी मिळाली. त्यामुळे हे मरकज केंद्र जगभरात प्रसिद्ध झाले. जगभरातून लोक येथे येऊ लागले.

मरकजचे आमिर म्हणजेच प्रमुखांच्या सल्ल्यानुसार मरकजमधील लोकांचे गट देश विदेशात जाऊन इस्लामची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवतात.  या गटांना जमात म्हणतात. या लोकांचे वास्तव्य त्या त्या भागातील मशिदीत वास्तव्य करतात. तसेच मरकजसाठी नवे लोक जोडतात. 

संबंधित बातम्या

राष्ट्रपती पुतीनही कोरोनाच्या सावटाखाली; लागण झालेल्या डॉक्टरांशी मिळवला हात

‘जर आम्हीच वाचलो नाहीत तर तुम्हाला कोण वाचवणार’; कोरोनासमोर का झाले डॉक्टर हतबल?

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात, कर्मचाऱ्यांनाही 50 ते 60 टक्केच वेतन

 मार्कजमध्ये केवळ जमीन आणि आकाशाचा उल्लेख होतो. इथे इतर कुठल्याही गोष्टीचा उल्लेख करण्यास पूर्णपणे बंदी असते. त्यामुळे तबलीगी जमातीला जगभरात कुठेही सहजपणे व्हिसा मिळतो. तबलिगी जमातीचा जलसा दरवर्षी भोपाळ तसेच देशातील इतर भागात होतो. मरकजमध्ये सहभागी जमात देशाशी पूर्णपणे समर्पित असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास ते सरकारऐवजी स्वतःस दोषी मानतात. खुदाने आपल्याला चांगले काम करण्यासाठी या जगात पाठवले आहे अशी त्यांची शिकवण आहे.

Web Title: coronavirus: Who is the Tablighi jamaat ? What does Markaz mean? BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.