शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

Coronavirus: देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणतात...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 15:36 IST

Coronavirus in India: कोरोना विषाणूची दुसरी लाट आता काहीशी ओसरली आहे. मात्र आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ही लाट येईल, येणार नाही, अशी चर्चा सुरू आहेयाबाबत सध्यातरी कुणी विश्वासपूर्वक काही सांगू शकत नाही.पण येणाऱ्या काळात विषाणूमध्ये म्युटेशन झाले तर त्याचा मुलांना धोका उद्भवू शकतो

नवी दिल्ली - एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत देशात धुमाकूळ घालणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता काहीशी ओसरली आहे.  (Coronavirus in India) मात्र आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. (When will the third wave of coronavirus come in the India, Important information was given by Union Health Minister Harsh Vardhan)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ही लाट येईल, येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सध्यातरी कुणी विश्वासपूर्वक काही सांगू शकत नाही. मात्र येणाऱ्या काळात विषाणूमध्ये म्युटेशन झाले तर त्याचा मुलांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मुलांचा विचार करू इंफ्रास्ट्रक्चर तयार करणे गरजेचे आहे.  

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीबाबत आणि लसीकरणावर ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी ब्लॅक फंगस या आजाराबाबत चिंता व्यक केली. हर्षवर्धन म्हणाले की, ब्लॅक फंगसचे जे रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच राज्यांनासुद्धा आजाराची सूचना देण्यास सांगितले आहे. 

यावेळी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाविरोधातील लसीकरणा वाढवण्याची गरज आहे. आमच्याकडे ज्या काही लसी आहेत त्या आपण लवकरात लवकर द्याव्या लागतील. तसेच येणाऱ्या महिन्यांत लसीच्या निर्मितीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी ब्लॅक फंगसने चिंता वाढवली आहे. अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. त्याबाबत केंद्र सरकारकडूनही चिंता व्यक्त करून सर्व राज्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. तसेच अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्य