शहरं
Join us  
Trending Stories
1
एका खेळाडूवर अवलंबून नाही! IND vs PAK लढतीपूर्वी विराटच्या प्रश्नावर Rohit Sharmaचं उत्तर
2
पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 
3
"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?
4
निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ
5
३ धावांवर ३ विकेट्स! Quinton de Kock 'डायमंड डक' ठरला, आफ्रिकेचा डाव गडगडला, Video 
6
रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र
7
"NDA सरकार पडणार", PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत
8
रोहित शर्माला पुन्हा दुखापत, संजना गणेसनची पोस्ट अन् जसप्रीत बुमराह नेतृत्व करण्याची चर्चा
9
Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर
10
दक्षिण आफ्रिकेने फास आवळला, नेदरलँड्सचा संघ कसाबसा शतकपार पोहोचला
11
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार
12
राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 
13
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
14
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
15
रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 
16
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
17
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
18
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
19
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
20
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा

कोरोनाचा वेग वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग, 'या' राज्यांमध्ये धोक्याची घंटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 9:30 AM

गेल्या आठवड्यात म्हणजेच रविवारपर्यंत देशात 36 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 

नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरस पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. शहर, उपनगरातील दैनंदिन कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज 5 हजारांहून अधिक नवीन कोरोना प्रकरणांची नोंद होत आहे. तसेच, देशात पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच रविवारपर्यंत देशात 36 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 

कोरोना प्रकरणांमध्ये 79 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी जवळपास सात महिन्यांतील सर्वाधिक आहे. कारण गेल्या आठवड्यापर्यंत ज्या राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी रुग्ण होते, त्या राज्यांमध्येही आता रुग्णांची संख्या वाढत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत भारतात कोरोनामुळे 68 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीच्या आठवड्यात 41 जणांचा मृत्यू झाला होता. तर केरळमध्ये सर्वाधिक 11,296 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी मागील आठवड्यापेक्षा 2.4 पट जास्त आहे. यानंतर महाराष्ट्रात 4,587, दिल्लीत 3,896, हरियाणामध्ये 2,140 आणि गुजरातमध्ये 2,039 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 

चिंताजनक बाब म्हणजे, ज्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आत्तापर्यंत प्रकरणे तुलनेने कमी होती, तेथे ही संख्या झपाट्याने वाढली. यामध्ये राजस्थान, जिथे आठवड्याच्या अखेरीस कोरोनाचे 631 रुग्ण आढळले. तर यापूर्वी 194 प्रकरणे होती. दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये 113 ते 462, ओडिशात 193 ते 597 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 129 ते 413, इतर राज्यांचाही समावेश आहे. भारतात 3 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान कोरोनाची 36,250 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर मागील आठवड्यात 20,293 प्रकरणे होती. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांचा हा सलग आठवा आठवडा होता.

राजस्थानमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या आणखी तीन जणांचा मृत्यू झाला असून संसर्गाची 197 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाचे 328 नवीन रुग्ण आढळून आले. या संख्येत आदल्या दिवसाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली असून त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 81,50,257 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत सहा हजारांहून अधिक जण गृहविलगीकरणातशहर, उपनगरातील दैनंदिन कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहर, उपनगरात 6 हजार 988 नागरिक गृहविलगीकरणात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. याखेरीज, शहरातील 1 हजार 367 सक्रिय रुग्णांपैकी 92 टक्के रुग्ण लक्षणविरहित असल्याचे निरीक्षण आहे. सध्या मुंबईतील पाच कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत 1 हजार 148 रुग्ण लक्षणविरहित आहेत, तर केवळ 91 रुग्णांमध्ये सौम्य, तीव्र आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तसेच, शहर, उपनगरात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 6.16 टक्के आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस