शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

CoronaVirus News: खासदारांनो, तुम्ही मास्क काढा, अन्यथा...; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 10:57 IST

राज्यसभेत फेस मास्क घातलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांना पाहून उपराष्ट्रपती संतापले

नवी दिल्ली: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन केलं जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी वारंवार मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. प्रशासनाकडून याबद्दल जनजागृती सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र देशात लॉकडाऊन सुरू होण्याच्या केवळ एक आठवडा आधी मास्क वापरणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर उपराष्ट्रपती भडकले होते. तुम्ही मास्क काढून या. अन्यथा, मी काय करेन हे तुम्हाला माहित्येय, या शब्दांमध्ये नायडूंनी विरोधी खासदारांना कारवाईचा इशारा दिला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २४ मे रोजी देशाला संबोधित केलं. मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर २५ मेपासून देशात लॉकडाऊन सुरू झाला. गेल्या दीड महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र मोदींच्या घोषणेच्या आठवड्याभर आधी विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत मास्क घालून आले होते. त्यावेळी सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यांना बाहेर जा आणि मास्क काढून या, अशी सूचना केली. १८ मार्च रोजी हा प्रकार घडला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  गेल्या दीड महिन्यांपासून सर्वच जण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करत आहेत. मात्र त्याच्या केवळ आठवडाभर आधी मास्क वापरणाऱ्या खासदारांना नायडूंनी कारवाईचा इशारा दिला होता. 'सदनात मास्क घालण्यास परवानगी नाही. तुम्ही सगळे वरिष्ठ सदस्य आहात. सदनाचं कामकाज साधण्यासाठी आवश्यक असणारे नियम तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही मास्क काढा. अन्यथा मी काय करेन याची तुम्हाला कल्पना आहे,' असं नायडू म्हणाले होते.'मी तुम्हाला मास्क काढण्याचं आवाहन केलं आहे. मास्क घातलेल्या सदस्यांनी जावं आणि मास्क काढून यावेत. खासदारांनी मास्क न काढल्यास सभागृहाचे कामकाज चालवणं कठीण होईल. यानंतर लोक इतरही गोष्टी सुरू करतील,' असं नायडूंनी म्हटलं होतं. यावेळी सभागृहात काहीसा गदारोळदेखील झाला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.एक छदामसुद्धा देणार नाही; ८० लाख निकृष्ट मास्क पाठवणाऱ्या चीनविरोधात 'या' पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रादेशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाललॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्राचिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू