सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं आता १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारनं लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लसींच्या उत्पादनाच्या ५० टक्के इतक्या लसी खुल्या बाजारात विकण्याची परवागी दिली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटनं आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर जाहीर केले होते. परंतु त्यानंतर एकाच लसीचे तीन दर का असा प्रश्न केला जात होता. तसंच राज्यांवरही बोजा पडू नये आणि सामान्यांनाही लस विकत घेता यावी यासाठी लसीचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता सीरम इनस्टिट्यूट ऑफ इंडियानं लसीचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. सीरमची कोविशिल्ड ही लस आता ४०० ऐवजी ३०० रूपयांना दिली जाणार असल्याचं अदर पूनावाला यांनी स्पष्ट केलं.
Coronavirus Vaccine : 'सीरम'ची मोठी घोषणा; 'कोविशिल्ड' लसीच्या दरात केली कपात, राज्यांना आधाराचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 18:19 IST
यापूर्वी अनेकांकडून लसीचे दर कमी करण्याची करण्यात आली होती मागणी. पाहा काय आहेत नवे दर.
Coronavirus Vaccine : 'सीरम'ची मोठी घोषणा; 'कोविशिल्ड' लसीच्या दरात केली कपात, राज्यांना आधाराचा हात
ठळक मुद्देयापूर्वी अनेकांकडून लसीचे दर कमी करण्याची करण्यात आली होती मागणीकेंद्रानं खुल्या बाजारपेठेतही लसींची विक्री करण्याची दिली होती परवागी