शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Vaccine : कोरोना लसीच्या परिणामकारकतेची तपासणी पुण्यातील ‘इर्षा’मध्ये होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 20:18 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर प्रत्येकजण लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ठळक मुद्दे‘इर्षा’मध्ये या चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधा

पुणे : भारतामध्ये कोरोनावरील लसींच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत. या लसीचे डोस दिलेल्या स्वयंसेवकांमध्ये निर्माण झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीचे परीक्षण पुण्यातील इंटरअ‍ॅक्टिव रिसर्च स्कुल फॉर हेल्थ अफेअर्स (इर्षा) या संस्थेमध्ये होणार आहे. लसीच्या मानवी चाचण्या घेणाऱ्या एका संस्थेशी या परीक्षणासाठी करार करण्यात आल्याची माहिती ‘इर्षा’चे संचालक डॉ. ए. सी. मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर प्रत्येकजण लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात सिरम इन्स्टिट्युटतर्फे आॅक्सफर्ड विद्यापीठाची ‘कोव्हिशिल्ड’, भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ व झायडस कॅडिला हेल्थकेअरच्या ‘झायकोव्ह-डी’ या लसींच्या दुसºया टप्प्यातील मानवी चाचण्यांना सुरूवात झाली आहे. तसेच आणखी चार ते पाच लसींच्या पहिल्या टप्प्यातील प्राण्यांवरील चाचण्या सुरू आहेत. मानवी चाचण्यांमध्ये स्वयंसेवकांना लसीचा डोस दिल्यानंतर त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. ठराविक कालावधीनंतर त्यांच्यामध्ये कोरोना विषाणुला प्रतिकार करणारी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या रक्ताच्या विविध तपासण्या केल्या जातात. या तपासण्या करण्यासाठी एका महत्वाच्या संस्थेने भारती विद्यापीठातील ‘इर्षा’ या संस्थेशी करार केला आहे. याविषयी माहिती देताना डॉ. मिश्रा म्हणाले, ‘इर्षा’मध्ये या चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधा आहे. मानवी चाचण्यांपुर्वीच्या प्राण्यांवरील चाचण्यांची तपासणीही संस्थेमध्ये केली जात आहे. त्यासाठी काही संस्थांशी करार झाला आहे. आता लसीचा डोस दिलेल्या स्वयंसेवकांच्या रक्तामध्ये किती प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे, याची तपासणी करण्यासाठी एका मोठ्या संस्थेशी करार करण्यात आला आहे. टप्प्याटप्याने त्याच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. या तपासण्यांचे निष्कर्ष संबंधित संस्थेला दिले जाणार आहेत. संस्थेमध्ये डेंग्यु, चिकनगुनिया यावरील लसींच्या परीक्षणासाठी विविध संस्थांशी करार केले आहेत. -----------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधन