सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे. १ मे पासून केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण हा पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी लस उत्पादक कंपन्यांच्या झालेल्या बैठकीनंतर सरकारनं एकूण लस उत्पादनाच्या ५० टक्के लसी खुल्या बाजारपेठेत विकण्याची मुभा दिली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी आपल्या लसीचे दर जाहीर केले होते. परंतु एकाच लसीचे तीन दर का असं म्हणत अनेकांनी त्यावर टीका केली होती. तसंच लसीचे दर कमी करण्याची मागणी अनेक स्तरातून होत होती. अशा परिस्थितीत बुधवारी सीरमनं आपल्या कोविशिल्ड या लीसचे राज्यांसाठी दर कमी केले होते. त्यानंतर गुरूवारी भारत बायोटेकनं आपल्या कोवॅक्सिन या लसीचे राज्यांसाठी दर कमी केले आहेत. भारत बायोटेकही आपली लस राज्यांना आता ४०० रूपये प्रति डोस या दरात उपलब्ध करून देणार आहे.बुधवारी सीरम इन्स्टिट्यूटनं राज्यांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या लसीचे दर कमी केले होते. त्यानंतर गुरूवारी भारत बायोटेकनं आपल्या लसीचे दर कमी केले आहेत. भारत बायोटेक आता राज्यांना ४०० रूपये प्रति डोस या दरात लस उपलब्ध करून देणार आहे. भारत बायोटेकनं एक पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली.
Coronavirus Vaccine : Covishield पाठोपाठ Covaxin लसीचे दरही कमी; भारत बायोटेकने केली महत्त्वाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 18:02 IST
सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे.
Coronavirus Vaccine : Covishield पाठोपाठ Covaxin लसीचे दरही कमी; भारत बायोटेकने केली महत्त्वाची घोषणा
ठळक मुद्देसध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.अशा परिस्थितीत लसीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे.