शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Breaking News : १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 19:27 IST

Coronavirus Vaccination : १ मेपासून देशात सुरू होणार तिसऱ्या टप्प्याला सुरूवात, १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस

ठळक मुद्दे १ मेपासून देशात सुरू होणार तिसऱ्या टप्प्याला सुरूवात१८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर देशात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.१ मे पासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. देशात लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहितही केलं जाणार आहे. तसंच लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत पहिल्यांदा घोषित केलेल्या किंमतींवर राज्य सरकारांना आणि खुल्या बाजारातही विक्री करु शकणार आहेत. तर ५० टक्के लसी कंपन्यांना केंद्र सरकारला पुरवाव्या लागतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान आता १ मे पासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. सध्या भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी नागरिकांना देण्यात येत आहेत. तर काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या आपात्कालिन वापराला मंजुरी दिली होती.  भारतामध्ये हैदराबादमधील डॉ. रेड्डी ही औषधनिर्माता कंपनी स्पुटनिक-V या लसीचे उत्पादन घेत आहे.   कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा वापर इतर देशांमध्येही सुरू आहे. त्यासाठी करारदेखील झाले असल्यानं भारतातून मोठ्या प्रमाणात लसींची निर्यात सुरू आहे. त्यामुळे देशात लसींचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळेच स्पुटनिक व्ही लसीला मंजुरी देण्यात आली. स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबनं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडसोबत (आरडीआयएफ) करार केला आहे. आतापर्यंत ५९ देशांमध्ये स्पुटनिक व्ही लसीचा वापर सुरू आहे. त्यामुळे स्पुटनिक व्ही लसीला मंजुरी देणारा भारत ६० वा देश ठरला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत