शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: अनलॉक ४ मध्ये प्रवासाला गती मिळणार, रेल्वे अजून १०० स्पेशल ट्रेन चालवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 07:04 IST

सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे.

ठळक मुद्देरेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या चालवण्याची तयारी केली जातत्यासाठी राज्यांच्या सरकारांकडे रेल्वेकडून संपर्क साधला जातया राज्यांकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर या अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची औपचारिक घोषणा केली जाईल

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध आता बऱ्यापैकी हटवण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या अनलॉक-४ च्या प्रक्रियेनुसार देशातील व्यवहारांना अधिकाधिक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतानाच औद्योगिक पट्ट्यांमध्ये श्रमिकांची मागणी वाढत चालली आहे. मात्र प्रवासाच्या साधनांवर सध्यातरी मर्यादा असल्याने प्रवास आणि दळणवळण अद्यापतरी अडचणीचे ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १०० हून अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या चालवण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी या रेल्वे गाड्या जिथून सो़डल्या जातील आणि जिथे पोहोचतील अशा राज्यांच्या सरकारांकडे रेल्वेकडून संपर्क साधला जात आहे. या राज्यांकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर या अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची औपचारिक घोषणा केली जाईल. मात्र किती विशेष रेल्वे सोडल्या जातील याची माहिती प्रवक्त्याने दिलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार किमान १०० विशेष गाड्या सोडल्या जातील.रेल्वेकडून सध्या देशभरात २३० विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र औद्योगिक पट्ट्यामध्ये कामगारांची मागणी वाढत आहेत. त्यामुळे अनेक गाड्यांची तिकिटे वेटिंगवर आहेत. सद्यस्थितीत सप्टेंबर महिन्यासाठीची रेल्वेची सर्व तिकिटे बूक झालेली आहेत. बिहार, बंगाल, ओदिशा, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश येथून महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि अन्न औद्योगिक क्षेत्रांकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची सप्टेंबर महिन्यासाठीची स्लीपर आणि एसी-३ ची तिकीटे बूक झालेली आहेत.देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून देशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आलेली आहे. नंतरच्या काळात रेल्वेने काही श्रमिक ट्रेन तसेच २३० विशेष गाड्या आणि ३० राजधानी गाड्या चालवल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत