शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मुलीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांतच ती झाली कर्तव्यावर हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 20:08 IST

डॉक्टर आणि पोलीस हे कोरोना वॉरियर्स आघाडीवर राहून या संकटाचा सामना करत आहेत. प्रसंगी ही मंडळी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनातील सुख-दु:खे बाजूला ठेवून कोरोनाविरोधातील लढाईत आपले योगदान देत आहेत.

भुवनेश्वर - कोरोना विषाणूच्या फैलावाने सध्या जगासमोर गंभीर संकट उभे केले आहे. भारतातही वाढत्या कोरोनाबाधितांमुळे परिस्थिती चिंताजनक बनलेली आहे. मात्र अशा परिस्थितीत डॉक्टर आणि पोलीस हे कोरोना वॉरियर्स आघाडीवर राहून या संकटाचा सामना करत आहेत. प्रसंगी ही मंडळी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनातील सुख-दु:खे बाजूला ठेवून कोरोनाविरोधातील लढाईत आपले योगदान देत आहेत. अशीच एक डोळ्याच्या कडा ओलावणारी घटना ओदिशामधून समोर आली आहे. येथे होमगार्ड म्हणून काम करणारी महिला आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांतच कर्तव्यावर हजर झाली. कोरोना स्पेशल ड्युटी लागलेली असल्याने या महिलेने वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून हा निर्णय घेतला.

गौरी बहरा असे या महिलेचे नाव आहे. तिची १३ वर्षांची मुलगी कर्करोगाने पीडित होती. दरम्यान, ड्युटीवर असतानाच त्यांना आपल्या मुलीची तब्येत बिघडली असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सायकलवरून लगबगीने आपले घर गाठले. घरी जाऊन पाहते तर तिची मुलगी हे जग सोडून निघून गेली होती. ‘त्यावेळी माझे जगच उद् ध्वस्त झाल्याची भावना माझ्या मनात आली,’ असे गौरी यांनी सांगितले.

दरम्यान,गौरी यांनी जड अंतकरणाने आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार करवून घेतले. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्या आपल्या कर्तव्यावर हजर झाल्या. दरम्यान, दु:खद प्रसंगातही त्यांनी उचललेल्या या खंबीर पावलाचे ओदिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयानेही कौतुक केले आहे. तर या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हे काम करून त्यांनी एक उत्तम उदाहरण आमच्यासमोर ठेवले आहे, असे त्या क्षेत्राचे एसपी उमाशंकर दास यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOdishaओदिशाIndiaभारत