शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रेल्वे सुरू; पण राज्यांतील परिवहन सेवा ठप्पच, प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 05:11 IST

श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे सतत सुरू आहेत. यात वाढही होत आहे. या रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहेत. प्रवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी वाहन मिळत नाही. अनेक ठिकाणी प्रवासी पायीच आपल्या घरी निघाले आहेत.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाच्या सूचनेवरून रेल्वेने १२ मेपासून रितसर रेल्वे सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे; पण दुसरीकडे राज्यांमध्ये सार्वजनिक परिवहन सेवा आणि कॅब सेवा बंद असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढू शकतात. अनेक राज्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला असे सांगितले आहे की, रेल्वे चालविण्याचा निर्णय घेत असाल, तर त्यासोबतच परिवहन सेवा आणि कॅब सेवा सुरूकरण्याचा निर्णयही घ्यायला हवा. असे केले नाही तर रेल्वे स्टेशनवर गोंधळ वाढू शकतो.श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे सतत सुरू आहेत. यात वाढही होत आहे. या रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहेत. प्रवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी वाहन मिळत नाही. अनेक ठिकाणी प्रवासी पायीच आपल्या घरी निघाले आहेत. काही जण मालवाहतुकीच्या वाहनाने प्रवास करीत आहेत. पूर्व आणि उत्तर भागातील राज्यांंत ही समस्या अधिक आहे. येथे ५ कि.मी.साठी प्रवाशांकडून ४०० ते ५०० आणि अनेक ठिकाणी १००० रुपयांपर्यंत वसुली केली जात आहे. दुसरीकडे प्रवासी श्रमिक एक्स्प्रेसमध्ये आपल्या राज्यात जाण्यासाठी ५०० रुपयांपर्यंत भाडे चुकते करीत आहेत. त्यामुळे रेल्वेसोबतच इतर परिवहन सेवाही सुरू करण्यात यावी, अशी सूचना बिहारने केंद्र सरकारला केली आहे.वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी सहकार्य करा -केंद्राचे निर्देशनवी दिल्ली : लॉकडाऊनच्या दिवसांत सर्व वैद्यकीय व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता व सफाई कामगारवर्ग आणि रुग्णवाहिकांचे येणे-जाणे सहजपणे होईल याची काळजी घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे.यांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध असतील, तर कोरोनाबाधित व इतर रुग्णांवर उपचार करणे व वैद्यकीय सेवा देणे कठीण होईल, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी पत्रात म्हटले. सगळे खासगी दवाखाने, नर्सिंग होम्स आणि प्रयोगशाळा वैद्यकीय व्यावसायिक व कर्मचाºयांसह खुल्या राहतील हे पाहावे, असे सांगून पत्रात म्हटले आहे, खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम्स सुरू ठेवल्यास नियमित वैद्यकीय सेवांवरील ताण कमी होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार