शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

Coronavirus : भारतात धोका वाढला! आणखी दोन राज्यांत रुग्ण आढळले, संख्या पोहोचली 45 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 9:39 PM

Coronavirus :कर्नाटकमधील बंगळुरू येथील एका आयटी इंजिनीअरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

ठळक मुद्देकर्नाटकमधील बंगळुरू येथील एका आयटी इंजिनीअरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. भारतात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. पंजाबमध्येही कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे

नवी दिल्ली : भारतातकोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणखी दोन राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक आणि पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या  45 वर पोहोचली आहे. 

कर्नाटकमधील बंगळुरू येथील एका आयटी इंजिनीअरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हा कर्नाटकातील पहिला रुग्ण आहे. तर पंजाबमध्येही कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण इटलीहून भारतात परतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

"कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह असलेला हा रुग्ण पत्नी आणि मुलीसह यूएसमधून 1 मार्चला भारतात आला. 5 मार्चपासून त्याच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आली. टेस्ट केल्यानंतर कोरोना व्हायरसची त्याला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या इतर व्यक्तींनाही वैद्यकीय देखरेखित ठेवण्यात आले आहे," कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. 

याआधी केरळच्या एर्नाकुलम येथे आज एका 3 वर्षाच्या मुलालाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. या मुलाचे कुटुंबीय नुकतेच इटलीहून परतले होते. या बालकाला एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये आतापर्यंत 9 कोरोना व्हायरसचे रुग्ण आहेत. 

दरम्यान, आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. 

आणखी बातम्या...

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला घोर, दिल्ली, भोपाळमध्ये बैठकांना जोर

योगी सरकारला हायकोर्टाचा धक्का, दंग्यातील आरोपींचे पोस्टर्स हटवण्याचे आदेश

VIDEO: जम्मू-काश्मीरच्या पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय! 

'कधीही प्रकाशात न आलेल्या पक्षाने शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे'

 

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत